Latest

पाकिस्तानचा दुटप्पीपणा उघड : अमेरिकेबरोबरच चीनच्‍या मदतीवरही डोळा!

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्‍या संरक्षण मंत्रालयाची अनेक गोपनीय कागदपत्रे सोशल मीडियावर
व्‍हायरल झाली होती. आता लीक झालेल्‍या कागदपत्रांमध्‍ये पाकिस्‍तानच्‍या परराष्‍ट्र मंत्री हिना रब्‍बानी खार यांच्‍या पत्राचा समावेश आहे. यातील माहितीनुसार, पाकिस्‍तानचा अमेरिकेबरोबर चीनकडून मिळणार्‍या फायद्यावरही डोळा असल्याचे स्पष्‍ट झाले आहे.

… तर चीनकडून मिळणारे फायदे सोडावे लागेल

मार्च महिन्‍यात पाकिस्‍तानच्‍या परराष्‍ट्र मंत्री हिना रब्‍बानी यांनी केलेला पंतप्रधान कार्यालयाशी केलेला पत्रव्‍यवहार लीक झाला आहे. पाकिस्‍तानची अवघड निवड या शीर्षकाखालील पत्रात त्‍यांनी म्‍हटले आहे की, पाकिस्‍तानने आता पाश्चिमात्य देशांना खूश करणे टाळणे गरजेचे आहे. आपला देश चीन आणि अमेरिका यांच्यातील मध्यभागी राहू शकत नाही. पाकिस्तानने अमेरिकेपुढे नमते घेतले तर चीनकडून मिळणारे मोठे फायदे त्याला सोडून द्यावे लागतील, असा इशाराही त्‍यांनी दिला आहे.

अमेरिकेच्‍या गुप्‍तचर विभागाला हिना रब्‍बानींचे पत्र कसे मिळाले ?

यापूर्वीही पाकिस्तानातील बड्या नेत्यांचे ऑडिओ लीक झाले होते. हिना रब्बानी यांचा गोपनीय माहिती असणारे पत्र अमेरिकेत कसे पोहोचले, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अमेरिकेला पाकिस्‍तानमधील अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील माहिती सहज मिळू शकते हे पुन्हा ‍एकदा स्‍पष्‍ट झाले आहे.

अमेरिकेने पाकिस्‍तानमधील मंत्र्याची गोपनीय माहिती चव्‍हाट्यावर आणण्‍याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १७ फेब्रुवारीच्या दुसऱ्या एका दस्तऐवजात पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या चर्चेचा उल्लेख करण्यात आला होता. युक्रेन संघर्षावर संयुक्‍त राष्‍ट्रांमध्‍ये करण्‍यात येणार्‍या मतदानाबाबत त्यांनी म्हटले होते की, "रशियाच्या निषेधाच्या ठरावाला पाठिंबा दिला नाही. यापूर्वी पाकिस्तानने अशाच प्रकारच्या प्रस्तावात सहभाग घेतलेला नाही. पाकिस्तानकडे रशियाशी व्यापार आणि ऊर्जा करारांवर बोलणी करण्याची क्षमता आहे." दरम्यान २३ फेब्रुवारी रोजी यूएनमध्ये रशियाविरोधात मतदान झाले तेव्हा मतदानात सहभागी न झालेल्या 32 देशांमध्ये पाकिस्तानचाही समावेश होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT