SS Rajamouli | 'मोहेंजोदडो'ला भेट देण्यासाठी पाकिस्ताननं परवानगी नाकारली, एसएस राजामौली यांचा मोठा खुलासा

पुढारी ऑनलाईन : बाहुबली आणि आरआरआर चित्रपटाचे निर्माते एसएस राजामौली (rrr ss rajamouli) यांना एक महत्वाची गोष्ट ट्विटरवर शेअर केली आहे. एका प्राचीन झाडापासून प्रेरित होऊन त्यांना ‘मोहेंजोदडो’वर (Mohenjo-daro) चित्रपट बनवायचा होता. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण मोहेंजोदडोला भेट देण्यासाठी पाकिस्तानने परवानगी नाकारली. उद्योजक आनंद महिंद्रा यांच्या एका पोस्टला उत्तर देताना राजामौली यांनी याबाबत खुलासा केला आहे.
एसएस राजामौली यांनी ट्विट करत म्हटले आहे की, २००९ मध्ये राम चरण आणि काजल अग्रवाल यांच्या भूमिका असलेला हिट चित्रपट ‘मगधीरा’चे (Magadheera) शूटिंग करत असताना धोलावीरा येथे एक झाड पाहायला मिळाले. ते इतके प्राचीन होते की त्याचे जीवाश्म बनले होते. सिंधू संस्कृतीचा उदय आणि अस्त यावर एक चित्रपट बनवायचा होता. त्यासाठी काही वर्षांनी पाकिस्तानला गेलो. मोहेंजोदडोला भेट देण्याचा खूप प्रयत्न केला. पण दुर्दैवाने मला परवानगी नाकारण्यात आली. असे त्यांनी पुढे म्हटले आहे.
आनंद महिंद्रा यांनी राजामौली यांना सिंधू संस्कृती जगाला कळावी यासाठी सिंधू खोऱ्याच्या कालखंडावर आधारित चित्रपट बनविण्यावर विचार करावा, असे म्हटले होते. त्यांनी मोहेंजोदडो, हडप्पा, धोलावीरा, लोथल आणि अन्य प्राचीन संस्कृतीचे चित्रण शेअर केले होते. ही आश्चर्यकारक उदाहरणे आहेत जी इतिहास जिवंत करतात आणि आपल्या कल्पकतेला चालना देतात, असे महिंद्रा यांनी ट्विट केले होते.
मोहेंजोदडोवर एक बॉलिवूड चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यात हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांच्या भूमिका होत्या. पण समीक्षक आणि प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मोहेंजोदडोचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते.
मोहेंजोदडो (Mohenjo-daro) हे ठिकाण पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आहे. ते कराचीच्या उत्तर-पूर्वेला ५१० किमी अंतरावर आहे. मोहेंजोदडो ही प्राचीन सिंधू संस्कृतीची वसाहत होती आणि ती सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असल्याचे मानले जाते. या ठिकाणाचा १९२२ मध्ये शोध लागला आणि १९८० मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून त्याचा समावेश केला होता. युनेस्कोच्या म्हणण्यानुसार, मोहेंजोदडोच्या शोधामुळे तेथील प्रथा, कला, धर्म आणि तेथील रहिवाशांच्या प्रशासकीय क्षमतेचा पुरावा समोर आला. (mohenjo daro civilization)
Yes sir… While shooting for Magadheera in Dholavira, I saw a tree so ancient that It turned into a fossil. Thought of a film on the rise and fall of Indus valley civilization, narrated by that tree!!
Visited Pakistan few years later. Tried so hard to visit Mohenjodaro. Sadly,… https://t.co/j0PFLMSjEi
— rajamouli ss (@ssrajamouli) April 30, 2023
हे ही वाचा :