Latest

Kolhapur news : कोल्हापूरच्या चित्रकारांचा रंगबहार मध्य प्रदेशात बहरणार

अनुराधा कोरवी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कलानगरी म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापूरच्या अभिजात चित्रकारांचा ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथे कल्पतरू आर्ट गॅलरीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने चित्र प्रात्यक्षिक आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रोफेसर वासंती जोशी कला सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रमोद कुमार जोशी यांनी आज कोल्हापुरातील चित्रकारांची भेट घेऊन संवाद साधला. ( Kolhapur news )

संबधित बातम्या 

कोल्हापूरच्या मातीशी आमची नाळ जुळली असून प्रोफेसर वासंती जोशी हे अभिनेते कैलासवासी चंद्रकांत मांडरे यांच्याकडे कला संस्कृतीचे धडे घेतले आहेत. त्यांच्या नावे ग्वाल्हेरमध्ये आम्ही कल्पतरू आर्ट गॅलरी सुरू करत आहोत. त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मरणार्थ कोल्हापूरचा कलाकारांचा सन्मान करण्याच्या निमित्ताने आम्ही कोल्हापुरातील चित्रकारांचे ग्वाल्हेर येथे २५ ते २६ नोव्हेंबर २०२३ अखेर चित्र प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन आयोजित केले आहे.

या चित्रकारांमध्ये चित्रकार प्राचार्य अजय दळवी. प्राचार्य राजेंद्र हंकारे, प्रशांत जाधव, विजय टिपुगडे, धीरज सुतार, सूर्यकांत निंबाळकर, अरुण सुतार, संपत नायकवडी, जगन्नाथ भोसले, अभिजीत कांबळे, प्रवीण वाघमारे, बबन माने, नागेश हंकारे, मनोज सुतार, श्रीरंग मोरे, सुनील पंडित आदी चित्रकार आपले चित्र प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन सादर करणार आहेत. यांच्यासोबत ग्वाल्हेर मध्यप्रदेश येथील स्थानिक चित्रकार यामध्ये सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात आज मंगळवार (दि.२६) रोजी कोल्हापुरातील मंगलधाम कार्यालय येथे अभिनेते चंद्रकांत मांढरे आणि प्रोफेसर वासंती जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून ज्येष्ठ चित्रकारांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी कोल्हापूरच्या कलावंताच्या वतीने प्रमोद कुमार जोशी यांचा समन्वयक प्रशांत जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमोद कुमार जोशी यांनी प्रोफेसर वासंती जोशी यांचे कोल्हापूर असलेल नातेसंबंध आणि आठवणी यांच्या स्मृतीस उजाळा दिला. व ग्वाल्हेर येथील प्रदर्शन आणि कार्यशाळेची माहिती नियोजन सांगितले. त्यांच्या नावे कला महाविद्यालयात अंतिम वर्षात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास सुवर्णपदक सुरू करणार आहोत असे जाहीर केले.

कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शिवाजी मस्के कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्राचार्य राजेंद्र हंकारे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. आमच्या कोल्हापूरकरांचा हा एक विशेष सन्मानच आहे असे सांगून कोल्हापूरच्या कलावंतांच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी त्यानी दिले. याप्रसंगी चित्रकार सूर्यकांत निंबाळकर यांनी अभिनेते चित्रकार चंद्रकांत मांढरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. विजय टिपुगडे यांनी आभार मानले. या कार्यक्रम प्रसंगी शाहीर राजू राऊत कोल्हापूर वस्तु संग्रहालयाचे पदाधिकारी उदय सुर्वे, उत्तम कांबळे इतर मान्यवर कलावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैत्रेयी शुक्ल यांनी केले. ( Kolhapur news )

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT