Latest

online pay upi banking : तुमचे पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यात जमा झालेत तर बातमी तुमच्यासाठी

backup backup

online pay upi banking : ऑनलाईन पेमेंट आणि UPI सुविधेमुळे बँकिंग क्षेत्रात मोठा बदल घडत लोकांचा बराच त्रास वाचला आहे. पूर्वी किरकोळ गोष्टीसाठीही बँकेच्या दारात जावे लागायचे. आता ऑनलाईन सुविधांमुळे आपल्या बँकेतील फेऱ्या वाचल्या आहेत.  तुमचे काम अधिकच सोपे झाले आहे; परंतु डिजीटल पेमेंट करताना तुम्हाला अनेक धाेके असतात. कधी तुमची फसवणुक झाली असेल तर कधी तुमच्या खात्यातून दुसऱ्याच्या खात्यात चुकून काही रक्कम गेल्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले असेल.या समस्या लक्षात घेत भारतीय रिझर्व बँकेकडून काही मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.

तुम्हाला एटीएम, यूपीआय किंवा नेट बँकिंग मधून कोणताही व्यवहार करायचा असेल, तर तुम्हाला लगेच एक मेसेज येईल, ज्यात तुम्ही योग्य व्यवहार केला आहे की चुकीचा व्यवहार झाला आहे, याची खात्री होईल. या मॅसेजमध्ये तुम्हाला एक फोन नंबरदेखील दिला जाईल.

online pay upi banking : आरबीआयच्या सूचनांनुसार माहिती मिळेल

जर तुमच्याकडून व्यवहार चुकीचा झाला असेल तर तुम्ही लगेच त्या फोन नंबरवर संपर्क करू शकता. तसेच झालेल्या घटनेबाबत माहिती देऊ शकता. तक्रार दिल्यानंतर बँकेने लगेचच तुम्हाला सहकार्य करणे अपेक्षित आहे. असे RBI कडून सांगण्यात आले आहे. अशी समस्या तुमच्यावर ओढावली तर तुम्ही लगेच तुमच्या बँकेला त्याबद्दल कळवावे. हा व्यवहार फसवणुकीमुळे झाला आहे की तुमच्या चुकीमुळे, याबाबत माहिती बँकेला द्या. तुम्ही तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करू शकता किंवा तुम्ही स्वतः बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला कोणाच्या खात्यात पैसे गेले, त्याचे बँक खाते, तारीख, वेळ इत्यादी सर्व काही सांगावे लागेल. ज्याला  पैसे पाठवले आहेत त्या बँकेशी तुम्ही संपर्क साधू शकता.

तुम्ही संबंधिताला कोर्टात खेचू शकता

चुकीने ज्‍याच्‍या खात्‍यावर पैसे जमा झाले आहेत त्याने पैसे देण्यास नकार दिला तर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. तुम्ही याबाबत तक्रार करून हे प्रकरण न्यायालयात नेणार असाल तर आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. मात्र, आता या प्रकरणाचा न्यायालयात निकाल लागणार असल्याने हे प्रकरण पुढे जाऊ शकते. तुमचे सर्व व्यवहार कोर्टासमोर सादर करावे लागतील. याचबरोबर तुम्ही चुकून पैसे ट्रान्सफर केले असतील तर जबाबदारी याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे, अशा परिस्थितीत बँक सुद्धा त्यासाठी जबाबदार नाही.

बँकेच्या मॅसेजेसवर तुमचे लक्ष असले पाहिजे

तुमच्या खात्यातून चुकीच्या यक्तीच्या खात्यात पैसे गेले असतील तर तुम्ही घाबरू नका. तुम्हाला अवघ्या काही तासात ते पैसे परत मिळतील. याचबरोबर तुम्ही युपीआयवरून व्यवहार करत असाल आणि चुकीचा खाते नंबर पडला तर तुम्हाला याबाबत मॅसेजद्वारे लगेच माहिती मिळते. तसेच तुमचा व्यवहार पूर्ण होत नाही.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT