पुढारी ऑनलाईन डेस्क
Omicron variant : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची धास्ती आहे. याआधी डेल्टा व्हेरियंट वेगाने पसरला होता. डेल्टाचा फुफ्फुसावर होणारा संसर्ग अधिक होता. यामुळे दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक होते. आता कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिंयंटबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंट हवेतून वेगाने पसरतो पण फुफ्फुसाला संसर्ग होण्याचा धोका कमी आहे, असे एका प्राथमिक स्वरुपातील संशोधनातून आढळून आले आहे.
कोरोनावरील हे संशोधन आहे. पण त्यातील निष्कर्षांची पुष्टी अद्याप झालेली नाही. कोरोना विषाणूत वारंवार बदल करतो. त्यामुळे या निष्कर्षात बदलही होऊ शकतो. ओमायक्रॉन आणि कोरोना विषाणूची इतर रूपे किती कार्यक्षमतेने गुणाकार करतात. यातील फरक ओमायक्रॉनच्या परिणामांचा अंदाज लावण्यास मदत करू शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.
आधीच्या डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत ओमायक्रॉन (Omicron variant) स्वतःमध्ये ७० पटीने अधिक वेगाने बदल करते आणि तो हवेत पसरुन एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत त्यांचा संसर्ग होतो. पण यामुळे गंभीर आजारी होण्याचा धोका कमी आहे, असेही संशोधनात आढळून आले आहे. या निष्कर्षांच्या औपचारिक अहवालाचा आढावा घेतला जात असून अद्याप तो संशोधकांच्या पथकाने प्रसिद्ध केलेला नाही.
हाँगकाँग विद्यापीठाने जारी केलेल्या एका वृत्तात, अभ्यास करणाऱ्या पथकाचे प्रमुख डॉ. मायकेल चॅन ची-वाई यांनी म्हटले आहे, "मानवांमध्ये रोगाची तीव्रता केवळ विषाणूंच्या प्रतिकृतीद्वारे निश्चित केली जात नाही, तर प्रत्येक व्यक्तीच्या संक्रमणास दिल्या जाणाऱ्या रोगप्रतिकारक प्रतिसादावर निश्चित केली जाते. संसर्ग हा कधीकधी जीवघेणा ठरतो."
जरी विषाणू कमी संक्रामक असला तरी तो अनेक लोकांना संक्रमित करून एक अतिशय संसर्गजन्य विषाणू ठरू शकतो. तसेच त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो, असेही पुढे चॅन यांनी म्हटले आहे. यामुळे हल्लीच्या अभ्यासांवरुन असे दिसून येते की लस घेतल्यामुळे ओमायक्रॉनचा धोका कमी होऊ शकतो. ओमायक्रॉन पेशींना अधिक घट्ट पकडतो आणि अँटिबॉडिजचा सामना करतो.
दरम्यान, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटनं (Omicron variant) जगभरातील लोकांमध्ये दहशत निर्माण केलीय. या व्हेरियंटच्या धास्तीने अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवासांवर निर्बंध घातलेत. अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलाय. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी, ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे घाबरण्याचे कारण नसून हा अति सौम्य स्वरुपाचा (super mild) व्हेरियंट असल्याचे म्हटलंय.
हे ही वाचा :