पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज (दि.१८) सरकारने घेतला. त्यानुसार २१ ऑक्टोबरला कर्मचाऱ्यांचा पगार खात्यावर जमा होणार आहे.
राज्य शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी केलेल्या मागणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचलंत का ?