Asia Cup 2023 : पाकिस्‍तान क्रिकेट बोर्डला झटका, आशिया चषक स्‍पर्धेचे यजमानपद काढून घेतले | पुढारी

Asia Cup 2023 : पाकिस्‍तान क्रिकेट बोर्डला झटका, आशिया चषक स्‍पर्धेचे यजमानपद काढून घेतले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 2023 मध्‍ये होणारी आशिया चषक क्रिकेट स्‍पर्धा ही पाकिस्‍तानमध्‍ये होणार नाही. ही स्‍पर्धा त्रयस्‍थ ठिकाणी खेळवली जाईल, असे ‘बीसीसीआय’चे सचिव आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्‍यक्ष जय शहा यांनी आज स्‍पष्‍ट केले. भारताच्‍या या घोषणेचा पाकिस्‍तान किकिेट बोर्डला मोठा झटका बसला आहे. आशिया चषक स्‍पर्धेतील यजमानपद गमावण्‍याची नामुष्‍की पाकिस्‍तानवर आली आहे.

काय म्‍हणाले जय शहा ?

आशिया चषक स्‍पर्धेबाबत बोलताना जय शहा म्‍हणाले की, “आता आशिया चषक २०२३ ही स्‍पर्धा त्रयस्‍थ ठिकाणी खेळवली जाईल. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्‍तानला जाणार का, याचा निर्णय केंद्र सरकार घेते. त्‍यामुळे यावर मी आताच बोलणे याेग्‍य ठरणार नाही. मात्र एवढे निश्‍चित की, २०२३ आशिया चषक स्‍पर्धा ही पाकिस्‍तानऐवजी त्रयस्‍थ ठिकाणी खेळवली जाईल.”

२०२३ मध्‍ये आशिया चषक स्‍पर्धा ही ५० षटकांची होणार आहे. ती पाकिस्‍तानमध्‍ये खेळवली जाईल, असे जाहीर झाले होते. आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी भारतीय  संघ पाकिस्‍तानला जाणार का, याबाबत संदिग्‍धता व्‍यक्‍त केली आहे. तसेच ही स्‍पर्धा पाकिस्‍तानमध्‍ये होणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केलेल्‍या हा पाकिस्‍तान क्रिकेट बोर्डला मोठा धक्‍का मानला जात आहे.

Asia Cup 2023 : भारत आणि पाकमध्‍ये गेली आठ वर्ष क्रिकेट मालिका नाही

भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात शेवटची क्रिकेट मालिका ही २०१२ मध्‍ये झाली होती. यावेळी टी-२० मालिका ही एक-एक अशी बरोबरीत सुटली होती. तर वनडे मालिका पाकिस्‍ताने २-1 अशी जिंकली होती.२००८ पासून भारत आणि पाकिस्‍तान यांच्‍यात कसोटी मालिका झालेली नाही. मुंबईवर २००८ नंतर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने  पाकिस्‍तानचा दौरा केलेला नाही. तसेच मागील काही वर्ष पाकिस्‍तानकडून सीमेवर होणार्‍या शस्‍त्रसंधी उल्‍लंघन आणि पुलवामा हल्‍ल्‍यानंतर भारत आणि पाकिस्‍तानमधील संबंध अधिक बिघडले आहेत. आता आंतररष्‍ट्रीय क्रिकेट बोर्डच्‍या आणि आशिया चषक स्‍पर्धेत हे दोन्‍ही संघ आमने-सामने येतात.

Back to top button