Latest

FIFA : फिफा वर्ल्ड कप एन्थम ‘लाइट द स्काय’ रिलीज, नोराचा डान्समधून जलवा

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील महिन्यात फिफा वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. कतारमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी ३२ संघ पात्र ठरले आहेत. कतार यजमान असल्याने कतारचा संघ देखील हा वर्ल्ड कप खेळणार आहे. फिफाने वर्ल्ड कपसाठी आपले एन्थम सॉन्ग 'लाईट द स्काय' रिलीज केलं आहे. हा फिफा वर्ल्ड कप बॉलीवूड स्टार – ग्लोबल आयकॉन नोरा फतेहीसाठी देखील खास ठरला आहे. नोरा फीफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करणार आहे. नोराला फिफा (FIFA ) वर्ल्ड कप एन्थम सॉन्ग 'लाइट द स्काय'मध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. ती या गाण्यावर डान्स करून उत्तम सादरीकरण करणार आहे. फिफाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. (FIFA )

फिफा वर्ल्ड कपच्या गाण्यात शकीरा, जेनिफर लोपेजदेखील सहभागी झाल्या आहेत. याआधी शकीराने २०१० फीफा वर्ल्ड कपच्या एन्थम सॉन्ग 'वाका-वाका' वर परफॉर्म केलं होतं आणि गाणं देखील गायलं होतं. तर जेनिफर लोपेज २०१४ मध्ये ब्राजीलमध्ये फिफा वर्ल्ड कपचे एन्थम सॉन्ग 'वी आर वन' मध्ये रॅपर पिटबुलसोबत दिसली होती. नोरा फीफा वर्ल्ड कपमध्ये भारत आणि साऊथ ईस्ट एशियाचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव कलाकार आहे.

यंदाचे फिफा एन्थम म्युजिक बँड रेड वनने प्रोड्यूस केलं आहे. या गाण्यात नोरा सोबत बलकीस फात्ही, मनल, रहमा रियाद दिसत आहेत. नोरा फिफाच्या एन्थम साँगच्या हिंदी व्हर्जनमध्ये दिसत आहे. फिफा एन्थमची पहली झलक नोराने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT