Latest

पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक निवडणूक : निवृत्ती गवारी यांची माघार

अनुराधा कोरवी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अ वर्ग मतदार संघातून (तालुका प्रतिनिधी-विकास सोसायटी) शिरुरमधून बँकेचे विद्यमान संचालक निवृत्ती गवारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच निवृत्ती गवारे यांच्यासह एकूण १३ उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस आय पुरस्कृत सहकार पॅनेलमध्ये आमदार अशोक पवार यांचे नाव शिरुरमधून अधिकृत उमेदवार म्हणून दोन दिवसांपुर्वी जाहिर केले आहे. त्यामुळे निवृत्ती गवारी यांच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, निवृत्ती गवारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आमदार पवार यांच्या निवडणुकीचा पक्षांतर्गत मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे.

असे असले तरी शिरुर अ मतदार संघांतून आणखी अर्ज कायम असल्याने याठिकाणी निवडणूक होणार की नाही? हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून काही मतदार संघातील जागावर उमेदवार उभे आहेत. त्याबाबतचा निर्णय लवकरच जाहिर होणे अपेक्षित मानले जात आहे.

निवृत्ती गवारी यांच्या माघारीनंतर ब वर्ग मतदार संघातून रविंद्र काळे, गुलाब सातपुते, क वर्गातून दत्तात्रय येळे, संभाजी होळकर, ड वर्गातून दत्तात्रय येळे, उत्तम धुमाळ, रविराज तावरे यांनीही सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

याशिवाय वि.जा./भ.ज./वि.मा. प्रवर्ग मतदार संघातून तेजश्री देवकाते पाटील, कल्याण आटोळे, भिमराव कोकरे, संजय देवकाते तर महिला प्रतिनिधीमधून तेजश्री देवकाते पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT