Latest

Pune Crime News : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकाला जमिनीत जिवंत पुरले; पुण्यातील धक्कादायक प्रकार

अमृता चौगुले

पुणे : वाघोली परिसरात नवजात अर्भकाला जमिनीत पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात अर्भकाचे पालकत्व न स्वीकारता त्याला बेवारस अवस्थेत सोडून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात अर्भकाचा जन्म अनैतिक संबंधांतून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अर्भकाचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. वाघोलीतील विठ्ठलवाडी परिसरात नवजात अर्भक अर्धवट जमिनीत पुरल्याचे उघडकीस आले. नागिरकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी नवजात अर्भकाला त्वरित रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्य झाला होता.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT