Latest

Adipurush : प्रभासला पाहून फॅन्स नाराज, कारण आहे तरी काय?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : एस एस राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित 'बाहुबली'च्या मोठ्या यशानंतर प्रभासचे (Prabhas) जगभरातील फॅन फॉलोईग प्रचंड वाढले आहे. तेव्हापासून प्रभासच्या झोळीत एकापेक्षा एक चित्रपट आहेत. सर्वात महागडा अभिनेता म्हणून प्रभासचं नाव घेतलं जातं! 'राधे श्याम' फ्लॉप झाल्यानंतर चाहत्यांना त्याच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली होती. तसं पाहिलं तर प्रभासने अनेक चित्रपट साईन केले आहेत. त्यापैकी एक केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नीलचा 'सालार' (Salaar). यंदाचा ओम राऊतचा (Om Raout) 'आदिपुरुष' (Adipurush)मध्ये हा बाहुबली स्टार प्रभास श्रीरामांच्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. त्याचे फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहेत. (Adipurush )

प्रभासचा राम अवतार

  • अभिनेता प्रभासने टीजरशी संबंधित आपल्या सोशल अकाऊंटवर पोस्टरदेखील रिलीज केलं. यामध्ये प्रभास वनवासी श्रीराम प्रभुच्या अवतारात दिसेल. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'येत आहे, अधर्मचा विध्वंस करण्यासाठी….'

फोटोमध्ये त्याचे मोठे केस, हातात धनुष्यबाण, गळ्यात आणि हातात रुद्राक्षच्या माळा धारण केलेल्या प्रभासचे पोस्टर रिलीज झाले आहे. यानंतर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पूर आला आहे. पोस्टर पाहून एका युजरने लिहिलं, हा साऊथ इंडियन चित्रपट नाही…तर एक भारतीय चित्रपट आहे.

आदिपुरुष पोस्टरला संमिश्र प्रतिक्रिया

प्रभासचे नवे पोस्टर पाहून फॅन्स हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचे म्हणत आहेत. एका युजरने लिहिलं. हा चित्रपट बाहुबलीच्या कलेक्शन पार करत २००० रुपयांची कमाई करेल. तर काही नेटकरी या पोस्टरने खुश नाही. एका युजरने लिहिलं-पोस्टरचं ग्राफिक्स चांगलं नाही वाटलं. नेटकऱ्यांनी या पोस्टरवर नाराजी व्यक्त केली.

तर एका फॅनने लिहिलं- यापेक्षा चांगलं राधेश्यामचं पोस्टर होतं. तमाम नेकऱ्यांनी निगेटिव्ह कमेंट्स दिले आहेत.

सैफ अलीचा लूकला पसंती

नवरात्रीत २ अक्टोबरला 'आदिपुरुष'चा ग्रँड इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. शरयू नदीच्या किनारी श्री राम की नगरी अयोध्यामध्ये ५० फूट लांब पोस्टर आणि 'आदिपुरुष'चा टीजर लॉन्च करण्यात आला. आदिपुरुषमध्ये श्रीरामांच्या अवतारात प्रभास, सीता मातेच्या अवतारात कृती सेनॉन तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. नेटकऱ्यांना प्रभासपेक्षा सैफचा लूक आवडला. हा चित्रपट १२ जानेवारी, २०२३ रोजी रिलीज होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT