पुणे : मासळी, मटण, चिकन, अंड्यांचे दर स्थिर | पुढारी

पुणे : मासळी, मटण, चिकन, अंड्यांचे दर स्थिर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: देशाच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून मासळी बाजारात दाखल होत आहे. नवरात्रोत्सवामुळे मटण, मासळी व चिकनला मागणी कमी प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत आवकही कमी असल्याने मटण, मासळी व चिकनचे गेल्या आठवड्यातील दर टिकून आहेत. दसर्‍यानंतर मागणी वाढून दरात वाढ होईल, अशी शक्यता व्यापार्‍यांकडून वर्तविण्यात आली. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 2) खोल समुद्रातील मासळीची 6 ते 8 टन, खाडी व नदीच्या मासळीची प्रत्येकी 200 ते 300 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची 8 ते 10 टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : 1800, मोठे : 1500-1600, मध्यम : 900-1000, लहान : 600-700, भिला : 500-600, हलवा : 480-600, सुरमई : 400-600, रावस : 480-850, घोळ : 700, करली : 300-320, करंदी (सोललेली) : 400-480, भिंग : 300-350, पाला : 1000-1400, वाम : 600-700, ओले बोंबील : 100-200. कोळंबी : लहान 120-280, मोठी : 360-550, जंबोप्रॉन्स : 1200-1400, किंगप्रॉन्स : 750-800, लॉबस्टर : 1600-1800, मोरी : 200-320, मांदेली : 100-160, राणीमासा : 160-200, खेकडे : 200-300, चिंबोर्‍या : 480-600.

खाडीची मासळी : सौंदाळे : 200-300, खापी : 160-200, नगली : 300-400, तांबोशी : 400-480, पालू : 200-240, लेपा : 120-160, बांगडा : 120-200, शेवटे : 200-240, पेडवी : 80-100, बेळुंजी : 120-140, तिसर्या : 200-240, खुबे : 100-120, तारली : 160-180. नदीतील मासळी : रहू : 160-180, कतला : 160, मरळ : 400-440, शिवडा : 200-240, खवली : 220-240, आम्ळी : 120-140, खेकडे : 300-360, वाम : 550-600. मटण : बोकडाचे 680, बोलाईचे 680, खिमा 680, कलेजी 720. चिकन 220, लेगपीस 270, जिवंत कोंबडी 160, बोनलेस 320. अंडी : गावरान (शेकडा) 910, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 445, डझन 66, प्रतिनग 5.50.

 

Back to top button