Latest

NEET-PG 2021 : राजधानी दिल्लीत निवासी डाॅक्टर आणि पोलीस भिडले

backup backup

नवी दिल्ली;  पुढारी ऑनलाईन 

NEET-PG 2021 काउन्सलिंगमध्ये उशीर झाल्याने दिल्लीमध्ये निवासी डाॅक्टरांनी रात्री उशीरापर्यंत प्रदर्शन केले. यामध्ये डाॅक्टरांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत. निवासी डाॅक्टरांच्या या आंदोलनामुळे सफरदजंग, आरएमएव आमि वेजी हार्डिंग आणि दिल्लीतील इतरही रुग्णालयांवर व रुग्णांना त्याची झळ पोहोचत आहे. फेडरेशन ऑफ रेजिडेंट डाॅक्टर्स असोशिएशनचे मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

असोशिएशनचे अध्यक्ष मनीष यांनी दावा केला आहे की, "या आंदोलनात मोठ्या प्रमाणात निवासी डाॅक्टरांनी प्रतिकात्मक विरोध करण्यासाठी एप्रन (लॅब कोट) परत केलेले आहेत. आम्ही मौलाना आझाद मेडिकल काॅलेजपासून उच्च न्यायालयपर्यंत रॅली काढण्याचाही प्रयत्न केला. पण, जसे आम्ही पुढे जाऊ लागलो तेवढ्यात पोलिसांकडून आम्हाला अडविण्यात आले. पोलिसांनी काही डाॅक्टरांना ताब्यात घेऊन, त्यांना ठाण्यातही घेऊन गेले. नंतर सोडून देण्यात आले.", असा दावा मनीष यांनी केला.

"यावेळी पोलिसांनी आपल्या ताकदीचा वापर केला, त्यामध्ये अनेक डाॅक्टर घायाळही झाले आहेत. असोशिएशनच्या ट्विटर अकाऊंटवरून पोलीस आणि डाॅक्टर यांच्यातील झटापटीचे फोटो अपलोड केलेले आहेत. १२ डाॅक्टरांना ताब्यात घेण्यात आले होते. इतकंच नाही तर लाठीचार्ज करण्याची धमकीही देण्यात आलेली होती. डाॅक्टरांना आयटीओ रोडवर जाम करण्यात आले", असंही मनीष यांनी सांगितले आहे.

असोशिएशनतर्फे सांगण्यात आलं आहे की, मेडिकल क्षेत्रातील लोकांसाठी हा काळा दिवस आहेत. निवासी डाॅक्टर, कोरोना योद्धा, NEET-PG 2021 काउन्सलिंगची प्रक्रिया वेगवान होण्याकरिता शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. पण, त्या डाॅक्टरांना मारहाण करण्यात आले आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आजपासून मेडिकल सुविधा पूर्णपणे बंद राहील", असंही असोशिएशनतर्फे सांगण्यात आले आहे.

हे वाचलंत का?

SCROLL FOR NEXT