Latest

NDA Exam 2021: महिला उमेदवारांसाठी नाेंदणी सुरु

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय लोकसेवा आयोगाने महिला उमेदवारांसाठी युपीएससी NDA Exam 2021 ची नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. रक्षा दलांमध्ये भरती होऊ इच्छीत असणाऱ्या महिलांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकतात.

या परिक्षेसाठी फक्त अविवाहित महिला अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर २०२१ आहे. NDA मध्ये एकुण ३७० जागा आहेत. यात २०८ सैन्य, ४२ नौदल आणि १२० वायुदल या जागा आहेत.

याशिवाय नौदल अकादमी (10+2 Cadet Entry Scheme) मध्ये ३० जागा आहेत.

वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००३ ते १ जानेवारी २००६ दरम्‍यानचा असावा.

शिक्षण

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या आर्मी विंगसाठी: बारावीचे शालेय शिक्षण किंवा राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने घेतलेली समकक्ष परीक्षा पास होणे अनिवार्य आहे.

बारावीत असलेले आणि या वर्षी परीक्षेला बसणारे उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी (https://upsconline.nic.in/upsc/FEMALE/mainmenu2.php) येथे क्लिक करा.
अर्ज करण्यासंबंधी अधिक माहितीसाठी (https://upsconline.nic.in/upsc/FEMALE/mainmenu2.php) येथे क्लिक करा.

हेही वाचलं का ?

ऑडिओ ऐकून केला अभ्यास | अल्पदृष्टी असणारा आनंद पाटील देशात 325 वा

SCROLL FOR NEXT