पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्जतमधील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) दोन दिवसाच्या वैचारिक मंथन शिबिरानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांचे थेट न घेता अनेक गौप्यस्फोट केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद (दि.२) घेत प्रत्युत्तर दिले आहे. "आम्ही विचारांशी बांधील आहोत, संधीसाधू नाही" असा टाला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे.
जे लोक सोडून गेले त्यांची चिंता करण्याच कारण नाही. जे सोडून गेले आहेत त्यामुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आता नवीन लोकांना संधी देण्याची गरज निर्माण निर्माण झाली आहे. आता जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
ज्या लोकांना आपण मोठे केले ते आपल्याला सोडून गेले. काही लोकांनी नवीन प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र वेगळं वातावरण निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करत असाल, तर आम्ही विचारांशी बांधील आहोत, आम्ही संधी साधू नाही, असा हल्लाबोल शरद पवार यांनी अजित पावर गटावर केला. पुणे येथे आज राष्ट्रवादीच्या आयोजित बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांना केले.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अनिल देशमुख आदी नेत्यांवर निशाणा साधला होता. बोलत असताना अजित पवार म्हणाले की,"मला सत्तेत जायला शरद पवार यांनीच सांगितले होते. मी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतो. तू भाजपसोबत जा, असे त्यांनी सांगितल्याने आम्ही भाजपसोबत सत्तेत गेलो" असा गौप्यस्फोट केला होता. पुढे बोलत असताना म्हणाले की, शरद पवार यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, त्यांनीच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला. मग अचानक स्वतःच काही कार्यकर्त्यांना पुढे करून राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करायला का सांगितले? आम्हाला भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्यास सांगून नंतर काही दिवसांत आपली भूमिका बदलली आणि आम्हालाच जनतेसमोर खोटे का ठरवले, असा उद्वेगही अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आवाहन केले की,"आमच्यावरील केसेसमुळे आणि गैरव्यवहारांच्या आरोपाला घाबरून आम्ही भाजपबरोबर सत्तेत सहभागी झालो, असा आरोप केला जातो. मात्र हे खोटे आहे. राजकारणात काम करताना आरोप होत असतात. पण ते सिद्ध झाले पाहिजेत. तरच त्याला अर्थ आहे. आता मी वारंवार त्याबाबत बोलणार नाही. आता आपल्याला मागे नाही, तर पुढे जायचे आहे. पक्ष संघटना मजबूत करायची."
हेही वाचा