Latest

NCP Ajit Pawar Group Meet : वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत – अजित पवार

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : NCP Ajit Pawar Group Meet : भाजप-शिंदे गट- राष्ट्रवादी यांना प्रचंड बहुमत आहे. राष्ट्रवादीत 9 जणांना मंत्रीपद मिळाले आहे. दिवसरात्र मी राज्यासाठी काम करतो. वैयक्तिक स्वार्थासाठी हा निर्णय नाही. सर्व समाजाला साथ देणारा मी नेता आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सत्तेत आलो आहे. शरद पवार यांच्या छत्रछायेखाली मी घडलो. साहेब आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. मात्र, सर्व क्षेत्रात महाराष्ट्र एक नंबर असायला हवा. महाराष्ट्राचा विकास हेच माझे स्वप्न आहे.

शरद पवार यांच्या छत्रछायेखाली मी घडलो. साहेब आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही कशासाठी काम करतो. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन पुढे जायचे आहे. हिंदवी स्वराज्याचा स्वप्न साकारायचे आहे. विकासासाठी पक्ष स्थापन केला.  1978 पासून साहेबांना राज्याने साथ दिली. देशाला करिष्मा असलेला नेतृत्व लागतं. पवार साहेबांनी सोनिया गांधी या परदेशी आहे. एक विदेशी महिला पंतप्रधान होऊ शकत नाही. तेव्हा साहेबांनी सभा गाजवली. आम्ही साहेबांसोबत एकत्र काम केले.

मी जे काही आहे ते साहेबांमुळेच आहे. मी कधीही जाती-पातीचे नात्या-गोत्याचे राजकारण केले नाही. सर्व क्षेत्रात महाराष्ट्र एक नंबर असायला हवा. महाराष्ट्राचा विकास हेच माझे स्वप्न आहे. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे राज्य जाणतो. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असला असता.

भाजप-शिंदे गट- राष्ट्रवादी यांना प्रचंड बहुमत आहे. राष्ट्रवादीत 9 जणांना मंत्रीपद मिळाले आहे. दिवसरात्र मी राज्यासाठी काम करतो. वैयक्तिक स्वार्थासाठी हा निर्णय नाही. सर्व समाजाला साथ देणारा मी नेता आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सत्तेत आलो आहे. 2014 ला वानखेडेवर आम्ही सर्व शपथविधीला गेलो. तेव्हा आम्हाला शपथविधीला का पाठवले, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT