पवार Vsपवार : अजित पवारांच्या बैठकीला दौंडचे अध्यक्ष गैरहजर

पवार Vsपवार : अजित पवारांच्या बैठकीला दौंडचे अध्यक्ष गैरहजर
Published on
Updated on

यवत: पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांची अजित पवारांच्या बैठकीला दांडी मारली आहे. उपमुख्यमंत्री पदाची अजित पवारांनी शपथ घेतल्या नंतर अजित पवारांनी नवीन राष्ट्रवादी काँग्रेस ची कार्यकारणी जाहीर केली असून राज्यातील जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष तसेच पक्षाचे आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांची बैठक मुंबईत बोलावली असून बुधवारी दुपारी होणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील बहुतांश तालुका अध्यक्ष हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात असताना दौंड चे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार हे मुंबई मध्ये असून देखील अजित पवारांनी बोलविलेल्या बैठकीला न जाता ते शरद पवार यांच्या सोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे ते खासदार सुप्रिया सुळे यांचे जवळचे आणि निष्ठावंत म्हणून आप्पासाहेब पवार ओळखले जातात

यापूर्वी देखील 1984 साली शरद पवारांच्या विरोधात राज्यातील आमदारांनी बंड केले असताना तत्कालीन नेते आणि आप्पासाहेब पवार यांचे वडील नानासाहेब पवार यांनी शरद पवारांना पाठींबा दिला होता तीच परंपरा अप्पासाहेब पवार यांनी कायम राखली आहे. तर दुसरीकडे दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांनी मात्र आपल्या प्रमुख समर्थकांच्या सह अजित पवार यांच्या बैठकीला हजेरी लावली आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news