MET NCP Aji Pawar Group Meeting : अजित पवार गटाची बैठक; वाचा कोण काय म्हणाले लाइव्ह… | पुढारी

MET NCP Aji Pawar Group Meeting : अजित पवार गटाची बैठक; वाचा कोण काय म्हणाले लाइव्ह...

पुढारी ऑनलाइन डेस्क : MET NCP Aji Pawar Group Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी पुन्हा एकदा भूकंप झाला. अजित पवार 35-40 आमदारांच्या पाठिंब्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी 8 आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत उभी फूट पडली. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच आता राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची का शरद पवारांची, कार्यकर्ते आमदार कोणाच्या बाजूने? यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. आज अजित पवार यांची मुंबईतील वांद्रेच्या एमईटी येथे राष्ट्रवादीतील अजित पवार गटातील बैठक सुरू झाली आहे. वाचा कोण काय म्हणाले… लाइव्ह

अजित पवार : सर्व क्षेत्रात महाराष्ट्र एक नंबर असावा; विकास हेच माझे स्वप्न

शरद पवार यांच्या छत्रछायेखाली मी घडलो. साहेब आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या. आम्ही कशासाठी काम करतो. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन पुढे जायचे आहे. हिंदवी स्वराज्याचा स्वप्न साकारायचे आहे. विकासासाठी पक्ष स्थापन केला.  1978 पासून साहेबांना राज्याने साथ दिली. देशाला करिष्मा असलेला नेतृत्व लागतं. पवार साहेबांनी सोनिया गांधी या परदेशी आहे. एक विदेशी महिला पंतप्रधान होऊ शकत नाही. तेव्हा साहेबांनी सभा गाजवली. आम्ही साहेबांसोबत एकत्र काम केले.

मी जे काही आहे ते साहेबांमुळेच आहे. मी कधीही जाती-पातीचे नात्या-गोत्याचे राजकारण केले नाही. सर्व क्षेत्रात महाराष्ट्र एक नंबर असायला हवा. महाराष्ट्राचा विकास हेच माझे स्वप्न आहे. प्रशासनावर माझी पकड आहे की नाही हे राज्य जाणतो. 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाची संधी होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असला असता.

भाजप-शिंदे गट- राष्ट्रवादी यांना प्रचंड बहुमत आहे. राष्ट्रवादीत 9 जणांना मंत्रीपद मिळाले आहे. दिवसरात्र मी राज्यासाठी काम करतो. वैयक्तिक स्वार्थासाठी हा निर्णय नाही. सर्व समाजाला साथ देणारा मी नेता आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सत्तेत आलो आहे. 2014 ला वानखेडेवर आम्ही सर्व शपथविधीला गेलो. तेव्हा आम्हाला शपथविधीला का पाठवले, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

अजित पवार यांनी सांगितले नाराजीचे कारण

2017 मध्ये भाजप सोबत 5 बैठका झाल्या. त्यावेळी भाजपने सांगितले होते शिवसेना 25 वर्षांपासून आमच्या सोबत आहे. आम्ही त्यांना सोडू शकत नाही. त्यामुळे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी युती होऊ शकते. मात्र, 2017 मध्ये शिवसेना जातीयवादी आहे, असे कारण देत युती होऊ शकत नाही. असे साहेबांनी सांगितले. मग 2019 मध्ये असे काय घडले की आम्हाला शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयाचा स्वीकार करावा लागला.

प्रफुल्ल पटेल : पवारांवर सगळ्यात जास्त टीका शिवसेनेने केली

प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्या मंचावर का शरद पवारांसोबत का नाही? हा प्रश्न फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशाला आहे. योग्य वेळी मी ते स्पष्ट करेन. भाजप सोबत जाण्याची आमदारांची इच्छा होती. मात्र, अजित पवार यांना बदनाम करण्याचा कट होता. अजित पवार यांना आमदारांनी नेहमीच पाठींबा दिला. आम्ही शरद पवार यांची सावली होतो. पण पवार यांनी आमचीही भावना समजून घ्यावी. पवार यांच्यावर सर्वाधिक टिका ही शिवसेनेने केली. मग शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर एनडीए सोबत का जाऊ शकत नाही.

सुनील तटकरे : अजित पवार राष्ट्रीय नेते 75 टक्के नेते अजित पवार यांच्यासह

अपमान गिळून अजित पवार यांनी पक्ष उभारला. पक्षाला ताकद देण्याचे काम अजित पवार यांनी केले. त्यामुळे आज कार्यकर्ते अजित पवार यांच्यासोबत आहेत. सर्वांनी काम केले असते तर अजित पवार आज मुख्यमंत्री असते. मात्र काहींनी केवळ मतदारसंघ राखले. राष्ट्रवादीचे 75 टक्के नेते अजित पवार यांच्यासह आहेत.

धनंजय मुंडे : साहेब विठ्ठल, आपण वारकरी

स्वाभिमानासाठी राष्ट्रवादीची निर्मिती केली. साहेब आमच्यासाठी विठ्ठल आहेत. आपण वारकरी आहोत. मात्र, हा निर्णय घेताना आम्हाला मनाला प्रचंड वेदना झाल्या. अजित पवार यांनीही अनेक वेदना सहन केल्या असतील? तटकरे यांनी पक्षाला नवसंजीवनी दिली. कठीण प्रसंगात सहकारी साहेबांसह आहेत. प्रत्येक गोष्टीत अजित पवारांना टार्गेट केले गेले. पक्षात काहीही झाले तरी अजित पवार यांच्याकडेच बोट दाखवले गेले. मात्र, अजित पवार यांनी शांतपणे टीका सहन गेली. राष्ट्रवादीने सर्व जाती-धर्मांना संधी दिली. राष्ट्रवादीने कायम शिवरायांना अभिप्रेत राजकारण केले. आमचे गुरू आमचे दैवत पवार साहेब…

रुपाली चाकणकर : साहेब आमचे दैवत पण विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांच्यासोबत

महाराष्ट्राच्या महिलांसाठी अजित पवार यांनी विविध योजना आणल्या. त्यांच्या उत्थानासाठी काम केलं. साहेबांच्या विरोधात कोणतीही भूमिका नाही. त्यांचे आशीर्वाद त्यांचा विचार घेऊनच आजची बैठक, मात्र, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही अजित पवार यांच्यासह काम करत आहोत.

छगन भूजबळ : साहेब आमचे विठ्ठल पण विठ्ठलाला बडव्यांनी घेरले; साहेब बडव्यांना दूर करा…

सर्व प्रकारच्या कारवाईचा विचार करूनच निर्णय घेतला. पक्षातील अनेक नेमणुका रखडलेल्या. सातत्याने सांगूनही पक्षात निवडणुका नाहीत. भाकरी फिरवली पण पण मुख्य रोटला कधी फिरवायचा? 2014 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगवेगळे का लढले. अजित पवार पहाटेच्या शपथ विधीला का गेले? याचा विचार करायला हवा…. आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला नाही, नागालँडमध्ये आमचे आमदार भाजपमध्ये मग आम्ही गेलो तर काय बिघडले? त्यांचा सत्कार केला आमचाही करा. साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण विठ्ठलाला बडव्यांनी घेरलय, साहेब बडव्यांना दूर करा… आम्ही आमिषाला बळी पडलेलो नाही.

 

 

Back to top button