

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईतील एमईटी येथे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा मेळावा आज (दि.५) होत आहे. यावेळी आमच्याकडे ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी केला. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आजही आदर आहे. त्यांना बडव्यांनी घेरले असून त्यांना दूर केले पाहिजे, असे मतही भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.
भुजबळ म्हणाले की, शरद पवार यांच्याविषयी आजही आमच्या मनात अपार प्रेम आणि श्रद्धा आहे. पण अचानक आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे. शरद पवार यांच्या निकटवर्तियांमध्ये सध्या बिनकामांच्या बडव्यांची गर्दी झाली आहे. यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत आहे,असे भुजबळ म्हणाले.
हेही वाचा