Latest

drugs : भाजपचं ड्रग्ज पेडलरशी कनेक्शन? फडणवीसांचा फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा गंभीर आरोप

दीपक दि. भांदिगरे

ड्रग्ज (drugs) प्रकरणी मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. भाजप आणि ड्रग्ज (drugs) पेडलर यांचे कनेक्शन असल्याचा आरोप करत मलिक यांनी कारागृहात असलेल्या जयदीप राणांचा फोटो ट्विट केला. जयदीप राणा हा ड्रग्ज पेडलर असून त्याच्यासोबत एका फोटोत फडणवीस दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या आशीर्वादानं ड्रग्ज कारभार सुरु होता. याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका गाण्यात देवेंद्र आणि सुधीर मुनगंटीवार झळकले. या संबंधित प्रॉडक्शनचा फायनान्सर जयदीप राणा होता, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला. देवेंद्र आणि अमृता फडणवीस यांच्यासोबतचा जयदीप राणा यांचा फोटो मलिक यांनी ट्विट केला आहे. हा व्यक्ती कोण आहे? 'या' ड्रग्स पेडलरचं भाजपसोबत कनेक्शन काय? असा सवाल त्यांनी केलाय.

'नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालाय'

दरम्यान, नवाब मलिक यांच्या आरोपावर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मलिकांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. वैयक्तिक पातळीवर फडणवीस यांच्या कुटुंबियांवर किळसवाण्या आरोपांच्या हरकती सुरु आहे. देशाच्या, महाराष्ट्राच्या इतिहासात कोणताही मंत्री असा वागलेला नाही. मलिक यांचे वांगणे पाहिले तर त्यांनी सर्व गोष्टींचे उल्लंघन केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभेल असे त्यांचे वागणे नाही. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपशी संबंध असलेला नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांचा दूत आहे. नीरज गुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील वाझे होता, असा आरोपही मलिक यांनी केला.

नवाब मलिक यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयागाचे उपाध्यक्ष अरुण हलदर आणि वानखेडे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांचे वर्तन संशयास्पद आहे. त्यासाठी हलदर यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचा इशारा मलिक यांनी दिला आहे.

वानखेडेंची खोटी कागदपत्रे दाखविली, असाही पुनरुच्चार त्यांनी केला आहे. गेल्या ९ महिन्यांपासून आपल्या जावयाला विनाकारण फसविले, असाही आरोप त्यांनी केला आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT