Latest

नाशिक : महिलेकडून पतीचा गळा आवळून खून, गळफास घेतल्याचा रचला बनाव

गणेश सोनवणे

नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा

महिलेने स्वतःच्याच पतीचा फेट्याच्या दोरीने गळा आवळून खून केला आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली, असा बनाव रचला. सिन्नर तालुक्यातील एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी पत्नीला अटक केली आहे. मुसळगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला. सिताराम लक्ष्मण गायकर (४२) मुक्काम आहुरली पोस्ट साजेगाव ता. इगतपुरी (ह मु. मुसळगाव हायस्कूल) असे हत्या झालेल्या पतीचं नाव आहे.

पती सिताराम गायकर यांनी पत्नी वनिता गायकर हिच्याकडे भिशी भरण्याकरता पोस्टातील आरडी मधून सहा हजार रुपये मागितले होते. या कारणावरून त्यांच्यात वाद होऊन संशयित वनिता गायकर हिने घरात असलेल्या फेट्याच्या दोरीच्या साहाय्याने पतीचा गळा आवळून जीवे ठार मारले. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात येऊन पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचून खोटी खबर दिली. यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद दाखल केली होती.

एमआयडीसी पोलिसांना आरोपी वनितावर संशय बळावल्याने कसून चौकशी केल्यानंतर मृताची पत्नी वनिताने आपणच सितारामचा खून करुन त्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वनितावर हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक करत कोर्टात रवाना केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर के त्रिभुवन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ बलक हे करत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT