Latest

नाशिक : गॅस सिलिंडरचा ट्रक उलटून महिलेचा मृत्यू

गणेश सोनवणे

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
हरसूलच्या वाघेरा घाटरस्त्यावर नियंत्रण सुटून पलटी झालेल्या गॅस सिलिंडरच्या ट्रकखाली दबून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेखा भोये असे महिलेचे नाव असून, त्या अपघातसमयी घरासमोरील अंगण झाडत होत्या. ही घटना चिंचवडजवळील नाकेपाडा वस्तीच्या वळणावर घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी आहे.

नाशिक येथून स्वयंपाकाचे गॅस सिलिंडरने भरलेला ट्रक (एमएच 15 इजी 7950) हरसूलकडे जात होता. वाघेरा घाटाच्या पायथ्याशी ट्रक आला असता, चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. त्याचवेळी रस्त्यालगतच्या घरासमोरील अंगण झाडणार्‍या रेखा अमोल भोये (30) या महिलेच्या अंगावर तो ट्रक पलटी झाल्याने त्या जागी ठार झाल्या. चालक अशोक पोपट शिंदे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर हरसूल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मृत रेखा भोये या आंबा निर्यात करणारे प्रगत शेतकरी व शिक्षक अमोल भोये यांच्या पत्नी आहेत. रेखा यांच्या दुर्दैवी मृत्यूने चिंचवडसह हरसूल परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT