Kriti Kharbanda : चर्चा क्रिती खरंबदाने नेसलेल्या ४५ हजार किंमतीच्या साडीची | पुढारी

Kriti Kharbanda : चर्चा क्रिती खरंबदाने नेसलेल्या ४५ हजार किंमतीच्या साडीची

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अभिनयाने आणि विशेषत: आपल्या कमनिय आणि आकर्षक बांध्याने सर्वांनाचे लक्ष वेधून घेणाऱ्या गुणी व प्रतिभावान अभिनेत्री क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) सध्या खूपच चर्चेत आहे. तर ती दुसऱ्या तिसऱ्या कारणासाठी नव्हे तर तिने परिधान केलेल्या साडीमुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिने सध्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत ती एका सुंदर अशा गुलाबी साडीमध्ये दिसत आहे. पण, चर्चेचा विषय ती आकर्षक साडी नसून त्या साडीची किंमत आहे. हो त्या साडीची किमंत तब्बल ४५ हजार रुपये आहे. या सुदंर साडीमध्ये क्रितीने फोटोशूट केले असून या साडीमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

Kriti Kharbanda

क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) गेल्या दशकापासून सिनेसृष्टीत स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे. तिने अत्यंत चांगले चित्रपट दिले असून अनेक चित्रपटात तिच्या कामाचे कौतुक झाले आहे. पण, तिला म्हणावे असे यश अद्याप तरी मिळाले नाही. त्यामुळे अद्याप ती स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करत आहे. असे जरी असेल तरी ती तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलीच ॲक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाॅउंटस् वरुन शेअर करत असते. सध्या देखिल तिने गुलाबी साडीमधील आपले काही फोटो शेअर केले आहे. या गुलाबीसाडीमधील तिच्या दिलखेच अदांनी सर्वांना मोहित केले आहे. तिच्या साडीतील मादक अदांनी चाहत्यांची झोप उडवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kriti Kharbanda (@kriti.kharbanda)

नुकतेच बॉलिवूडचा दंबग सलमान खानने (salaman khan) ईदच्या निमित्ताने पार्टी दिली होती. त्याच्या या पार्टीला सिनेसृष्टीतील सर्वच दिग्गजांनी हजेरी लावली होती. या पार्टीचे आयोजन सलमानची बहिन अर्पिता (Arpita Khan Sharma)  हिने केले होते. या पार्टीला अभिनेत्री क्रिती खरबंदा हिने देखिल हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये क्रितीने तब्बल ४५ हजाराची साडी परिधान करुन एन्ट्री केली. त्यामुळे सध्या चर्चा ही क्रितीने परिधान केलेल्या साडीची होत आहे. या पार्टीला येण्यापुर्वी क्रितीने या परिधान केलेल्या साडीमध्ये स्वत:चा एक छोटेखानी फोटोशूट देखिल करुन घेतला. या साडीतील कृतीचा सिंपल पण स्टायलीश अंदाजावर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.

या पार्टीमध्ये क्रिती खरबंदा (Kriti Kharbanda) हिने अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) सोबत हजेरी लावली. यावेळी पुलकीतने तिला साडी साभाळण्यासाठी देखिल मदत केली. क्रिती आणि पुलकित दोघे ही रिलेशनशीपमध्ये आहेत. तसेच दोघांनी या नात्याला माध्यमांपासून आणि लोकांपासून लपवलेलं नाही. पुलकित सम्राट हा सलमान खानचा बहिणीचा नवरा होता. नुकतेच त्याने सलमानच्या बहिणीला घटस्फोट दिला व सध्या तो क्रितीला डेट करतो आहे.

Back to top button