Latest

नाशिक : तीन वाहनांच्या अपघातात बारा कामगार जखमी

गणेश सोनवणे

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडिवऱ्हेजवळ शुक्रवारी (दि. 31) सायंकाळी 5.30 च्या सुमारास कंपनी कामगारांची बस, रिक्षा व एक टेम्पो या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. यात बसमधील 10 ते 12 कामगार जखमी झाले असून काही कामगार गंभीर आहेत.

अपघाताची माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात सुभाष निनाजी उंबरकर (४७), पूजा वाळू कदम (२७), मनोज गुलाब सोनवणे (२६), प्रशांत रामचंद्र शिरसाठ (३५), स्नेहकांत माधवराव कानडे (४०), सुभाष दत्तात्रेय सदगीर (३७), रितेश कैलास त्रिभुवन (३०) अशी जखमी कामगारांची नावे आहेत.

यातील काही जखमींची नावे समजू शकली नाहीत. घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मदत केली. जखमी कामगार गोंदे औद्योगिक वसाहतीतील सॅमसोनाइट कंपनीतून नाशिकला बसमधून जात होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT