पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील पोस्टरवरून ‘आप’चे 8 जण अटकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

अहमदाबाद; वृत्तसंस्था : गुजरातमधील अहमदाबादेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टर्स लावल्याप्रकरणी आम आदमी पक्षाच्या 8 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. आपच्या पोस्टर मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी ही कारवाई झाली.

गुजरात आपचे प्रमुख इसुदन गढवी यांनी अटकेच्या या कारवाईचा निषेध केला आहे. अटकेची ही कृती म्हणजे हुकूमशाहीचा नमुना आहे. भाजपने कितीही रोखले तरी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते लढत राहतील, असेही गढवी यांनी सांगितले. आपने मोदींविरोधात देशव्यापी पोस्टर मोहीम सुरू केली आहे. हिंदी आणि उर्दू व्यतिरिक्त गुजराती, पंजाबी, तेलगू, बंगाली, उडिया, कन्नड, मल्याळम आणि मराठी भाषांमध्येही ही मोहीम राबविण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news