Latest

नाशिक : शेतपिकांची पाहणी करत खासदार गोडसे यांचे मदतीचे आश्वासन

अंजली राऊत
नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
अवकाळी पावसामुळे नाशिक तालुक्यातील वजारवाडी लोहशिंगवे आदी भागासह इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील काही खेडेगावातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खा. हेमंत गोडसे यांनी स्वतः संबंधीत जागेवर जाऊन पाहाणी केली.
या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत त्वरीत पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नाशिक तालुक्यासह इगतपुरी व सिन्नर तालुक्यातील काही खेडेगाव परिसरात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. भाजीपाल्यासह द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा, कलिंगड आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बळीराजा पूर्ण हतबल झाला आहे.  याबाबत शेतकऱ्यांनी आपली करुण व्यथा खा. हेमंत गोडसे यांच्याकडे मांडली असता खा. गोडसे यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठी ठामपणे उभा असून लवकरच आपण मंत्रीमंडळाशी चर्चा करुन मदतीसाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT