Latest

नाशिक : पत्नी व मुलांच्या मारहाणीत पतीचा मृत्यू

अंजली राऊत

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
शनिवारी (दि.18) रात्री किरकोळ कौटुंबिक वादातून पती, पत्नी व दोन मुलांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसन मारहाणीत होऊन पत्नी व दोन मुलांनी लाठ्याकाठ्यांनी केलेल्या मारहाणीत तालुक्यातील वराडी-कुंदलगाव शिवारातील पतीचा मृत्यू झाला आहे. या खून प्रकरणात पत्नी व दोन्ही मुलांना चांदवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण वराडी गाव व परिसर हादरला आहे.

पूनमचंद शिवाजी पवार (43) असे मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. पवार कुटुंबात कौटुंबिक वादातून भांडण झाले हाते. यात पत्नी सुनीता व मुले भूषण आणि कृष्णा या दोन्ही मुलांनी पूनमचंद यांना लाठ्याकाठ्यांनी जबरदस्त मारहाण केली. यात गंभीर जखमी होऊन पूनमचंद यांचा जीव गेला. घटनेची रविवार (दि.19) माहिती मिळताच मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. चांदवडचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ, मंगेश डोंगरे, अमित पवार, बिन्नर, अशोक पवार, जाधव यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवला. त्यानंतर तो नाशिकला हलवला आहे. या खून प्रकरणी भावराव शिवाजी पवार (52) यांनी फिर्याद दिल्याने संशयित आरोपी सुनीता पवार (पत्नी), भूषण व कृष्णा दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र जाधव तपास करीत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT