

पिंपरी : प्रेमप्रकरणावरून चार जणांनी घरात घूसून एकाला मारहाण केली. धक्काबुक्की करत त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 17) मावळ तालुक्यातील साळुंब्रे येथे घडली. या प्रकरणी मंगेश निवृत्ती दोंड यांनी शिरगाव परंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. फिर्यादी यांचा भाऊ सचिन याला मारहाण करण्यासाठी आरोपी फिर्यादीच्या घरात शिरले होते. त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच, फिर्यादीच्या घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी केली. आरोपींनी फिर्यादीला धक्काबुक्की करत त्यांना कारमध्ये बसवून घेवून जाण्याचा प्रयत्न केला.