Latest

Online Fraud : ऑनलाईन ट्रेडिंगच्या माध्यमातून तरुणाची दीड लाखाची फसवणूक

अविनाश सुतार

उमरखेड; पुढारी वृत्तसेवा : ऑनलाईन ट्रेडिंगच्या (Online Fraud) माध्यमातून एका तरुणाची १ लाख ५७ हजार १४० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना उमरखेड येथे बुधवारी (दि. २२) उघडकीस आली. या प्रकरणी सचिन रामपुरी गोस् (रा. बोरबन, उमरखेड) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सचिन यास WWW.UKD189.IN या वेबसाईटवर रचिका ट्रेडिंग लिमिटेड च्या प्रतिनिधीने लॉगिन करण्यास सांगितले. तसेच, त्यावरून १४० रुपयाचे रिचार्ज व ई-कॉमर्स साईटवरून २०० रुपयाचे घडयाळ खरेदी करण्यास सांगून त्या मोबदल्यात ३०० रुपये सचिनच्या खात्यात जमा केले. त्यामुळे सचिन यांचा या वेबसाईटवर (Online Fraud) विश्वास बसला.

त्यानंतर सचिन यांनी १ लाख ५७ हजार १४० रुपये गुंतवणूक केली. तसेच, त्या मोबदल्यात रक्कम जमा करण्याची विनंती केली. मात्र, संबधित आरोपीने जवळपास १ लाख रुपये रिचार्ज केल्याशिवाय २ लाख ६५ हजार रुपये काढता येणार नाहीत, असे सांगितले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच सचिन यांनी उमरखेड पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी रचिका ट्रेडिंग लिमिटेडवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT