Latest

Nanded Hospital Death : नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मोहन कारंडे

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nanded Hospital Death)

संबंधित बातम्या : 

या रुग्णालयात गेल्या तीन दिवसांत चाळीसवर मृत्यू झाल्यामुळे (Nanded Hospital Death) राज्यात खळबळ उडाली आहे. कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकीच्या मृत्यू प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामाजी टोंपे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात भरती असताना त्यांना बाहेरुन ४० हजारांहून अधिक रूपयांची औषधे खरेदी करण्यास त्यांनी भाग पाडले. तसेच रक्त व इतर चाचण्यांसाठीही पैसे खर्च करावे लागले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. कुरुळा येथील महिला प्रसूतीसाठी आली असता सिझेरिन झाले. त्यात माता व बाळाचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT