Latest

नबाब मलिकांचे नवे ट्विट; पिक्चर अभी बाकी है

backup backup

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांच्यातील सामना अधिकच रंगत असून मलिकांचे नवे ट्विट  'पिक्चर अभी बाकी है'  सस्पेन्स  वाढवत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मलिक एकामागोमाग एक गौप्यस्फोट करत असून त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढत आहेत. क्रूझवरील पार्टीवर छापा टाकल्यानंतर त्यातील साक्षीदारांनीच वानखेडे यांच्यावर आरोप केले.

त्यानंतर वानखेडे यांची चार तास खातेनिहाय चौकशी केली. त्यानंतर वानखेडे यांनी उच्च न्यायालयात संरक्षणासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी झाली. वानखेडे यांना अटक करण्याआधी तीन दिवस सूचना द्यावी असा आदेश दिला आहे.

नबाब मलिक यांनी रोज एक ट्विट करून रोज नवा गौप्यस्फोट केला आहे. बुधवारी त्यांनी क्रूजवरील व्हिडिओ व्हायरल करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज क्रूजवरील व्हिडिओ प्रसिद्ध करून तो व्हिडिओ पार्टीचा आयोजक काशिफ खान हा समीर वानखेडे यांचा घनिष्ट मित्र असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली नसल्याचे सांगितले.

मलिक यांनी केलेल्या गौप्यस्फोटांमुळे वानखेडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज मलिक यांनी आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' असे म्हणत सस्पेन्स वाढविला आहे.

नबाब मलिकांचे नवे ट्विट : फर्जीवाडा उघड

क्रूजवरील पार्टीवर केलेली कारवाई ही संशयास्पद आहे. त्यानंतर हायकोर्टात जाऊन संरक्षण मागणे, खातेअंतर्गत चार तास चौकशी या सर्व बाबी समीर वानखेडे यांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, असा आरोप नबाब मलिक यांनी केला आहे. पार्टीत जर ड्रग्ज वाटले जात होते तर त्या पार्टीच्या आयोजकावर कारवाई का केली नाही? असा आरोप मलिक यांनी केला आहे.

एनसीबीकडून चौकशी….

एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने केलेल्या आरोपांनुसार एनसीबीच्या पाच सदस्यीय पथकाने एनसीबी मुंबईचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. वानखेडे यांचा जबाब नोंदविण्यात येत असल्याचे एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी सांगितले.

मुलगा आर्यन याला सोडण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोपासह पंच प्रभाकर साईल याने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार एनसीबी महासंचालकांनी नेमलेले पाच सदस्यांची समिती पथक मुंबईत दाखल झाले आहे. एनसीबीचे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हे पथक या आरोपांची चौकशी करत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT