अमृतसर, पुढारी ऑनलाईन : शिखांचे पवित्र स्थान असलेल्या अमृतसर येथील प्रसिद्ध सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिब यांच्यासमोर ठेवलेल्या तलवारीला स्पर्श केल्याने एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या तरुणाने रेलिंगवरून उडी मारून हे कृत्य केल्यानंतर जमावाने त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली. संबधित युवक हा उत्तर प्रदेशचा असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहरास साहिब पाठ सुरु असताना एका अज्ञात तरुणाने रेलिंगवरुन उडी मारली. त्याने गुरु ग्रंथ साहिब यांच्यासमोर ठेवलेल्या तलवारीला हात लावला. क्षणात घडलेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. दर्शनासाठी आलेल्या जमावाने तरुणाला बाहेर नेत बेदम मारहाण केली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पंजाबच्या गृहमंत्र्यांनीही याला दुजोरा दिला आहे.
सुवर्ण मंदिरात तरुणाची हत्या: मारहाणीत मृत्यू
अमृतसर शहराचे डीजीपी (कायदा आणि सुव्यवस्था) परमिंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एक २४-२५ वर्षीय तरुण पवित्र पुस्तक (गुरु ग्रंथ साहिब) ठेवण्यात आलेल्या ठिकाणी उडी मारून गेला. त्याने तलवारीच्या सहाय्याने अपवित्र काम करण्याचा प्रयत्न केला. त्याला जमावाने पकडून बाहेर नेले असता बाचाबाची झाली आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीत मृत्यू झाला.'
संबधित तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या तरुणासोबत अन्य काही लोक होते का? याचा तपासही सुरू आहे, अशी माहिती सिंग यांनी दिली.
भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी यामागे कट असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संपर्क साधला आहे. शहा यांनी योग्य तपास करण्याचं आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनीदेखील ही घटना खेदजनक असून निषेध व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अशी घडली घटना
हेही वाचा :