Latest

Murder : अमळनेर तालुका हादरला! वेगवेगळ्या घटनेत दोघांचा खून

गणेश सोनवणे

जळगाव : मागील काही दिवसांपासून शांत असलेल्या अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. सोमवारी (दि. २४) रात्री उशिरा खुनाच्या घटना घडल्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पहिल्या घटनेत अमळनेर शहरातील दाजीबानगरात कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात लाउडस्पीकरचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून अक्षय राजू भील (वय-२१) या तरूणावर सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पाच ते सहा जणांनी चाकू भोसकून गंभीर जखमी केले होते. त्याला धुळे येथील शासकीय रूग्णालयात उपाचारार्थ दाखल केले असता, उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दुसऱ्या घटनेत अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास खुनाची घटना घडली आहे. यात नाना मंगलसिंग बारेला (वय-२१) या तरूणाला वैयक्तिक वादातून संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला (वय-२२) याने कुऱ्हाडीने वार करून नाना बारेला याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ, पोहेकॉ सुनील जाधव, पोकॉ राहुल पाटील यांनी सावखेडा गावातील खून प्रकरणात संशयित आरोपी डेबूजी सुरसिंग बारेला याला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT