Latest

NITIE ला लवकरच IIM चा दर्जा शक्य : मुंबईला मिळणार पहिले IIM?

अविनाश सुतार

मुंबई : पुढारी ऑनलाईन : मुंबईतील पवई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिग (NITIE) या संस्थेला लवकरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी आधिवेशनात या संदर्भातील विधेयक सादर केले जाणार आहे.

जानेवारी महिन्यात केंद्रीय शिक्षण मंत्रायलायाने या संदर्भात एक समिती स्थापन केली होती. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (NITIE) ही संस्था औद्योगिक अभियांत्रिकी, अभियांत्रिकी व्यवस्थापन, व्यवस्थापन शास्त्र अशी विषयांतील अभ्यासक्रम चालवते. मंत्रालयाने यापूर्वी जी समिती स्थापन केली होती त्याचा उद्देश या संस्थेची IIM साठीची क्षमती तपासणी करण्याचा होता. या समितीच्या स्थापनेच्या प्रस्तावनेत मंत्रायलाने बरीच सकारात्मक मते मांडली होती.

केंद्रीय मंत्रालय संसदेच्या अधिवेशनात २४ विविध प्रस्ताव सादर करणार आहे. त्यामध्ये एक प्रस्ताव हा NITIE ला IIM चा दर्जा देण्याबद्दलचा आहे. याबद्दल फारशी माहिती आम्हाला नाही; पण आवश्यक ती कॅबिनेट नोट बनवण्यासाठी लागणारी माहिती आमच्याकडून घेण्यात आली आहे. IIMचा दर्जा मिळाला. तर त्यात पायाभूत सुविधांत विकास करण्याचा भागही आहे. शिवाय मुंबईसाठीचे हे पहिले IIM ठरणार आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT