Latest

मराठी सुंदरतेची खाण! Mrunmayee Deshpande चा सारेगमपसाठी स्टनिंग लूक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी सुंदरतेची खाण अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने सारेगमप या शोसाठी स्टनिंग लूक शेअर केला आहे. (Mrunmayee Deshpande) खण साडीत मृण्मयीने फोटोशूट केला आहे. (Mrunmayee Deshpande) तिच्या वन नॉट बॅकलेस ब्लाऊजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मृण्मयीने अपलोड केलेल्या फोटोजना For saregamapa अशीही कॅप्शन दिलीय.

मृण्मयीने हिरव्या रंगाची खण साडी, लाल रंगाचे ब्लाऊज, केसात गजरा, नाकात नथ, गळ्यात लॉन्ग चिंचपेटी दागिना परिधान केला आहे.

सुभेदार चित्रपटात केशरच्या भूमिकेत दिसणार

दरम्यान, मृण्मयीचा सुभेदार चित्रपटातील पहिला लूक समोर आला. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' चित्रपट २५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'श्री शिवराज अष्टका'मधील 'सुभेदार' हे पाचवे पुष्प आहे. या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे.

दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केलेल्या फोटोत मृण्मयीच्या डोक्यावर पदर, हळदीने भरलेला मळवट, मोठं कुंकू, नाकात नथ, गळ्यात कवड्याची माळ, कपाळ्यावर आट्या पाहायला मिळत आहे. ती या चित्रपटात मृण्मयी केशर या भूमिकेत दिसणार आहे.

दिग्पाल यांनी हात बांधून लई मर्द बनतुया? ह.. हात सोड! मग तुला नाय मुघलांच्या सात पिढ्यांना दावते.. मराठ्यांना नडायचा नतीजा काय असतुया @mrunmayeedeshpande- केशर अशी कॅप्शनही लिहिलीय.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT