Bijli Mahadev Temple : या मंदिरावर १२ वर्षातून एकदा पडते वीज! | पुढारी

Bijli Mahadev Temple : या मंदिरावर १२ वर्षातून एकदा पडते वीज!

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिमाचल प्रदेशातील सुंदर पर्वतीय प्रदेशातील एक म्हणजे कुल्लू. निसर्गाने वेढलेलं आणि समृद्ध, सुंदर घरे, प्राचीन संरचनांपर्यंत अनेक गोष्टींसाठी ओळखले जाते. कुल्लू जिल्ह्यातील एका अनोख्या मंदिराविषयी काही रंजक गोष्टी सांगितल्या जातात. या मंदिराला खूप धार्मिक महत्त्व आहे. हे मंदिर बिजली महादेव म्हणून ओळखले जाते. (Bijli Mahadev Temple) बिजली महादेव मंदिर हे २ हजार ४६० मीटर उंचीवर असलेल्या कुल्लू खोऱ्यातील काशवारी या सुंदर गावात आहे. हे मंदिर शिव देवतेला समर्पित आहे. भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांमध्येही याची गणना होते. अनेक पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. कुल्लू घाटीतील सुंदर गाव काशवरी येथे हे बिजली महादेव मंदिर आहे. (Bijli Mahadev Temple). हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.

रिपोर्टनुसार, मंदिराच्या आत स्थित असलेले शिवलिंग प्रत्येक वर्षी १२ वर्षांनी विजेच्या संपर्कात येते. ज्यामुळे शिवलिंग खंडित होते. यानंतर पुजारी खंडित शिवलिंगला अन्न, डाळ आणि पीठ तसेच मीठविरहित लोण्याच्या मिश्रणाने जोडतात. स्थानिक लोक हा भगवान शिवचा आशीर्वाद मानतात. काही लोकांचे हेदेखील म्हणणे आहे की, ही वीज एक दिव्य आशीर्वाद आहे, ज्यामध्ये अनेक शक्ती असतात.

काही महिन्यांनंतर शिवलिंग पहिल्यासारखे स्थितीत येऊ लागते. येथील लोकांची मान्यता आहे की, भगवान शिवच्या आदेशाने भगवान इंद्र देव १२ वर्षानी वीज सोडतात. हे मंदिर कुल्लूहून जवळपास २० किमी दूर आहे. तुम्ही ३ किमीचा ट्रेक करतदेखील तिथे पोहोचू शकता. हा ट्रॅक पर्यटकांसाठी खूप मजेदार आहे. घाट आणि नद्यांच्या मनोहर दृश्यांसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

file photo

Back to top button