Seema Chandekar : सिद्धार्थ चांदेकरने आई सीमा चांदेकर यांचे लावले दुसरे लग्न | पुढारी

Seema Chandekar : सिद्धार्थ चांदेकरने आई सीमा चांदेकर यांचे लावले दुसरे लग्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने त्याची आई सीमा चांदेकर यांचे दुसरे लग्न लावून दिले. (Seema Chandekar ) सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या आईच्या लग्नाचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शनमध्ये मोठी पोस्ट लिहिलीय. सिद्धार्थ चांदेकरने पोस्टची सुरुवात Happy Second Innings आई! अशी लिहित केली आहे. (Seema Chandekar)

सिद्धार्थ चांदेकरने म्हटले आहे-तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं? तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life❤️ 📸 @shrutisbagwe #उत्तरार्ध.

मिताली मयेकर हिने इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे- Happy married life सासूबाई!❤️

माझ्या सासूचं लग्न! किती सूना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते?
खरंच मला अभिमान वाटते तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला. आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा.
आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच.
तुला आणि नितिन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम.❤️

सिद्धार्थने फोटो शेअर केल्यानंतर स्पृहा जोशी, मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, प्रिया बापट, सायली संजीव, गौतमी देशपांडे, अभिजित खांडकेकर, अमृता खानविलकर, वैभव तत्ववादी या कलाकारांनी शुभेच्छा आणि अभिनंदन केले आहे.

Back to top button