Latest

mount manaslu : गिरिप्रेमी जितेंद्र गवारेची 8163 मीटर शिखरावर चढाई

backup backup

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : गिरिप्रेमी संस्थेचे गिर्यारोहक जितेंद्र गवारे यांनी माउंट मनास्लू (mount manaslu) या ८१६३ मीटर उंच व जगातील आठव्या उंच शिखरावर मंगळवारी यशस्वी चढाई केली व नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

या आधी गवारे यांनी एप्रिल महिन्यात माउंट अन्नपूर्णा-1 या जगातील दहाव्या उंच शिखरावर तर मे महिन्यात माउंट एव्हरेस्ट या जगातील सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई केली होती. जेष्ठ गिर्यारोहक व शिवछत्रपती पुरस्कार विजेते उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन गवारे यांना लाभले.

याविषयी बोलताना उमेश झिरपे म्हणाले, जितेंद्र हा तयारीचा गिर्यारोहक असून, त्याची मानसिक व शारीरिक तंदरुस्ती वाखाणण्या जोगी आहे. सहा महिन्याच्या आत तीन अष्टहजारी शिखर चढाई करण्याची क्षमता त्यात होती व त्याला यात यश आहे, याचा आम्हा गिरीप्रेमींना आनंद आहे.

या आधी लेह-लडाखमधील कांगयात्से 1 व 2 या शिखरांवर, गढवाल हिमालयातील माउंट मंदा-1 शिखरावर गिरिप्रेमीच्या यशस्वी मोहिमा संपन्न झाल्या. जितेंद्रच्या या यशाने नेपाळमधील माउंट मनास्लु (mount manaslu) शिखरावर देखील भारतीय तिरंगा डौलाने फडकला.

नेपाळमधील गोरखा भागामध्ये स्थित असलेले 'माउंट मनास्लु' या शिखराची उंची 8163 मीटर असून उंचीनुसार या शिखराचा जगामध्ये आठवा क्रमांक लागतो. तसेच मनास्लु हा पर्वत उर्जेचे स्त्रोत व स्फूर्तीदायक पर्वत म्हणून ओळखला जातो.

SCROLL FOR NEXT