Latest

रशियातील ५ हजारांहून अधिक गर्भवती प्रसूतीसाठी अर्जेंटिनामध्‍ये, जाणून घ्‍या कारण ( Russian pregnant women )

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील काही दिवसांपासून रशियातील पाच हजारांहून अधिक गर्भवतींनी अर्जेंटिना गाठले आहे. विशेष म्‍हणजे, त्‍यांनी प्रसूती होण्‍यास एका आठवड्याचा कालावधी असताना देश सोडला आहे. दरम्‍यान, रशियातील गर्भवर्तीचा अर्जेंटिनात जात असल्‍याची गंभीर दखल देशातील स्‍थलांतर विभागाने घेतली आहे. ( Russian pregnant women )

Russian pregnant women : तीन महिलांना अटक

रशियाच्‍या स्‍थलांतर विभागाचे प्रमुख फ्लोरेन्सिया कॅरिग्नानो यांनी सांगितले की, अर्जेंटिनाच्या राजधानीत गुरुवारी विमानाने आलेल्या ३३ महिलांपैकी तीन महिलांना वैध कागदपत्रे नसल्‍याने अटक करण्‍यात आली. संबंधित रशियन महिलांनी सुरुवातीला दावा केला होता की, त्या पर्यटक म्हणून अर्जेंटिनाला जात होत्या. मात्र सखोल चौकशीत संबंधित महिला पर्यटनासाठी आल्‍या नसल्‍याची कबुली दिली आहे. त्‍यांनी सांगितले की, प्रसूतीनंतर मुलांना अर्जेंटिनाचे नागरिकत्व मिळावे, यासाठीच आम्‍ही रशियातून स्‍थलांतर केल्‍याची कबुली त्‍यांनी दिली आहे.

काय आहे अर्जेटिनामध्‍ये प्रसूती होण्‍याचे कारण ?

रशियाच्‍या तुलनेत अर्जेटिना पासपोर्ट हा अधिक सुविधा देतो. अर्जेंटिना देशाचा पासपोर्ट धारकांना तब्‍बल १७१ देशांमध्‍ये व्हिसाशिवाय प्रवेश करता येतो. त्‍यामुळे रशियन महिला मुलांना अर्जेंटिनामध्‍ये जन्‍म देणे पसंत करत आहेत. अर्जेटिनात
जन्‍म झाल्‍यास येथील नागरिकत्‍व मिळते. त्‍यामुळे मुलांना या देशाचा पासपोर्टही मिळतो. या देशाच्‍या पासपोर्टला असणार्‍याल सुविधांचा फायदा मिळावा यासाठी रशियन गर्भवती मुलांना अर्जेंटिनामध्‍ये जन्‍म देण्‍यास उत्‍सूक असतात.

वेबसाइटवर गर्भवतींना आमिष दाखवण्‍याचा प्रयत्‍न

एक रशियन भाषेतील वेबसाईट अर्जेंटिनामध्‍ये प्रसूतीसाठी इच्‍छूक गर्भवतींना विविध पॅकेजेसची ऑफर देते. संबंधित वेबसाईट प्रसूतीचे नियोजन, विमानतळावर सेवा, भाषेचे धडे आणि अर्जेंटिनाच्या राजधानीतील सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये राहण्याच्या खर्चावर सवलत देते. ही वेबसाईट २०१५ पासून सेवा पुरवत आहे. दरम्‍यान, पर्यटनाच्‍या नावाखाली अर्जेटिनामध्‍ये जावून प्रसूतीसाठी रुग्‍णालयात दाखल होणार्‍या तीन गर्भवतींना ताब्‍यात घेण्‍यात आले आहे. या कारवाईचा त्‍यांचे वकील रुबिलर यांनी निषेध केला आहे. संबंधित महिला नियमांचे पालन करतच अर्जेंटिनामध्‍ये दाखल झाल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT