Latest

Mohammed Zubair : मोहम्मद झुबेरची अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव

नंदू लटके

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
जातीय तेढ वाढविण्याचा गंभीर आरोप असलेला अल्ट न्युजचा सर्वेसर्वा मोहम्मद झुबेर ( Mohammed Zubair) याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे झुबेरविरोधात 'हेट स्पीच'चा गुन्हा दाखल असून, हा गुन्हा हटविला जावा तसेच अटकपूर्व जामीन दिला जावा, अशी विनंती झुबेर याने सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

Mohammed Zubair : उच्च न्यायालयाचा गुन्हा रद्दबातल करण्यास नकार

अलाहाबाद उच्च न्यायालयाने झुबेरविरोधातला गुन्हा रद्दबातल करण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. झुबेर याला त्याच्या कृत्याबद्दल जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे त्याचे वकील कोलीन गोन्सालवीस यांनी सांगितले. झुबेरच्या याचिकेवर शुक्रवारी ( दि. ८ ) सुनावणी होणार आहे.

झुबेर याला 17 जून रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. हिंदू देव-देवतांविरोधात 2018 साली आक्षेपार्ह ट्विट केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती. दुसरीकडे सीतापूर येथेही त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. सीतापूर प्रकरणात तेथील न्यायालयाने झुबेरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. झुबेरविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT