Latest

MLA Disqualification : विधानसभा अध्यक्षांची बेकायदेशीर सरकारला सुरक्षा : संजय राऊत

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमदार अपात्रता याचिकांवर आठवडाभरात सुनावणी घेत वेळापत्रक निश्चित करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (दि.२५) विधान भवनात पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होत आहे. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना आज ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. " विधानसभा अध्यक्ष बेकायदेशीर सरकारला सुरक्षा देत आहेत," असा आरोप राऊत यांनी केला आहे.

संबंधित बातम्या : 

"सर्वोच्च न्यायायालायाने अनेक वेळा महाराष्ट्रातील सरकार बेकायदेशीर असल्याचे म्हटलं आहे. तरीही विधानसभा अध्यक्ष जे आता भाजपचे मोठे वकील बनले आहेत, त्यांनी बेकायदेशीर सरकारला सुरक्षा दिली आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे. पण आमचा विश्वास सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांवर आहे," असे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आमदार अपात्रेतेवर सुनावणी होणार आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT