Latest

Sushmita Sen Birthday : सुष्मिताने शेअर केला एक नंबर जो तिला १३ वर्षांपासून फॉलो करतोय…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन अनेकदा तिच्या प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सुष्मिताने तिच्या फिल्मी करिअरमध्ये मोजक्याच चित्रपटात भूमिका साकारल्या. परंतु, त्या चित्रपटाचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं. आज सुष्मिताचा ४७ वा वाढदिवस साजरा ( Sushmita Sen Birthday ) करत आहे. सुष्मिताने सौंदर्याच्या बाबतीत २०-३० वर्षांच्या स्टार्सनादेखील मागे टाकलं आहे. ती नेहमी फिट अॅन्ड फाईन राहण्यासाठी योग्य डाइट प्लान फोलो करत असते. याच दरम्यान सुष्मिताने तिला गेली १३ वर्षापासून सातत्याने एक गोष्ट फोलो करत असल्याची माहिती दिली आहे.

अभिनेत्री सुष्मिता सेन वाढदिवसाच्या निमित्ताने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक सेल्फी फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती ब्लू कलरच्या आउटफिट्समध्ये एकदम हॉट दिसत आहे. यासोबत तिने डोळ्यावर घातलेल्या चष्माने ती आणखीच स्टायलिश दिसतेय. सुष्मिताच्या चेहरा सूर्यप्रकाश, मेकअप आणि लिपस्टिकने तिच्या सौंदर्यात भर घातली आहे. या फोटोच्या कॅप्शनमधून तिने गेली १३ वर्षापासून फोलो करणाऱ्या नंबरची माहिती दिली आहे.

हा फोटो शेअर करताना सुष्मिताने एका हटके कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, '४७ शेवटी! गेल्या १३ वर्षांपासून मला फॉलो करणारा हा नंबर ?❤️? . सर्वात अतुलनीय वर्ष आता जवळ येत आहे. मला ते खूप दिवसांपासून माहीत आहे आणि शेवटी त्याच्या आगमनाची घोषणा करताना मला आनंद होत आहे!!! #duggadugga ???❤️. असे लिहिले आहे. यावरून सुष्मिताला ४७ हा आकडा यशस्वी (लक्की) असल्याचे वाटत आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसोबत अनेक स्टार्सदेखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही चाहते बी-टाऊनच्या कॉरिडॉरमधून सुष्मिता सेनला शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत.

याच दरम्यान सुष्मिता सेनची मुलगी रेनी सेन हिने सोशल मीडियावर आईसोबतचा एक फोटो करून तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये रेनीने 'हॅपी बर्थडे माँ' असे लिहिले आहे. यासोबत सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याने देखील तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रोहमन आणि सुष्मिता जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांचे बाँडिंग खूप चांगले होते. पंरतु, गेल्या वर्षी दोघे विभक्त झाले. रोहमनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सुष्मिता सेनचा एक ब्लॅक अॅन्ड व्हाईट आणि फोटो शेअर करत त्याला रेड ईमोजी ४७ असे लिहिले आहे. ( Sushmita Sen Birthday )

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT