HBD Karan Johar : कोट्यवधी रुपयांचे घर ते लक्झरी कार, करण जाेहरची संपत्ती आहे तरी किती?

karan johar
karan johar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलीवूडचा प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा (HBD Karan Johar) बॉलीवूडच्या एक प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक आहे.  तो आपल्या चित्रपटातून नव्या कलाकारांना संधी देतो, त्यामुळेच त्याला खास ओळख मिळाली. 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाचे दिग्दर्शक करत त्‍याने आपल्या करिअरची सुरुआत केली होती. (HBD Karan Johar) तो सोशल मीडियावरदेखील खूप चर्चामध्ये राहतो. धर्मा प्रोडेक्शनचा मालक करण जोहर आपले जीवन खूप शानदार आणि आलीशान पध्दतीने जगतो. आज तो कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. आज करण आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने या प्रोडक्शन हाऊसच्या मालकाकडे  किती संपत्ती आहे, जाणून घेऊया.

करण जोहरची एकूण संपत्ती

करण जोहरची एकूण संपत्ती २०० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास १४०० कोटी रुपये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही वर्षांमध्ये करणच्या संपत्तीत वाढ झाली आहे. निर्माता आणि दिग्दर्शक करण हा चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सर्वात अधिक टॅक्स देणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.

आलिशान घर

करण जोहरने २०१० मध्ये मुंबईतील कार्टर रोडवर सी फेस डुप्लेक्स खरेदी केले होते. ८ हजार स्क्वेअर फूटच्या डुप्लेक्सची किंमत सुमारे ३२ कोटी रुपये होती. करणच्या या घराची बाल्कनी गौरी खानने डिझाईन केली आहे. याशिवाय मुंबईच्या मलबार हिल्समध्ये करण जोहरचे आणखी एक घर आहे, ज्याची किंमत सुमारे २० रुपये कोटी आहे.

करण जोहरच्या लक्झरी कार

करणकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत ८ कोटी रुपयांपर्यंत आहे. कार ब्रँड्समध्ये BMW 745, BMW 760, Mercedes S Class आणि Mercedes Maybach यांचा समावेश आहे. ज्याची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे, ज्यामध्ये सर्व लक्झरी सुविधा आहेत. याशिवाय त्याने सुमारे ४८० कोटी रुपयांची वैयक्तिक गुंतवणूकही केली आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news