Latest

MG New SUV Launch : ‘एमजी’ची नवीन एसयुव्ही कार लॉन्च; ‘या’ कंपन्यांना देणार टक्कर

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या भारतीय ऑटोमोबाईल उद्योगक्षेत्रामध्ये नवीन एसयुव्ही आणि त्यांच्या नवीन आवृत्त्या सातत्याने लॉन्च होताना दिसत आहेत. आता यामध्‍ये आणखी एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्लॅक एडिशनची भर पडली आहे. 'एमजी' कंपनीने ब्लॅक एडिशनमधील त्यांची नवीन एसयुव्ही आज (दि. ६ सप्टेंबर) भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली. या नवीन एसयुव्हीची स्‍पर्धा अनेक दिग्गज कंपन्यांच्या प्रसिद्ध कारसोबत असेल, अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (MG New SUV Launch)

एमजी मोटर्सने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केलेली Aster ब्लॅक एडिशनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीची ही दुसरी एसयूव्ही आहे, जी ब्लॅक एडिशनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. एमजीने ब्लॅक एडिशनमधील ग्लॉस्टर ही कार मेमध्ये लॉन्च केली होती. त्यानंतर आता कंपनीची ही दुसरी ब्लॅक एडिशनमधील कार आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

'एमजी'च्या ॲस्टरच्या ब्लॅक एडिशनला ब्लॅक स्टॉर्म असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये कारच्या बाहेरील आणि आतील भागातही काळ्या आणि लाल रंगाची थीम देण्यात आली आहे. एसयूव्हीला पूर्णपणे काळा रंग देण्यात आला आहे. त्याच वेळी, ब्रेक कॅलिपर लाल रंगात ठेवण्यात आला आहे. आतील भागातही सीट्स, एसी व्हेंट्स इत्यादींना काळ्या थीमसह लाल रंगाने हायलाइट करण्यात आले आहे.

ॲस्टर ब्लॅक एडिशनमधील फिचर्स

या एसयूव्हीमध्ये पॅनोरामिक सनरूफ, डिजिटल कीसह ब्लूटूथ, आय स्मार्ट टेक्नॉलॉजी, क्रूझ कंट्रोल, एबीएस, ईबीडी, फ्रंट एअरबॅग्ज, ईएसपी, टीसीएस, एचएचसी, ईएसएस, टीपीएमएस, पार्किंग सेन्सर तसेच कंपनीकडून 49 हून अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. तसेच लाइव्ह लोकेशन, अँटी थेफ्ट इमोबिलायझर, फाइंड माय कार, जिओफेन्स, इंजिन स्टार्ट अलार्म, ई-कॉल आणि आय-कॉल यासारख्या फिचर्सचा समावेश आहे.

ॲस्टरची इंजिन क्षमता

कंपनीने SUV मध्ये 1.5 लीटर VTI Tech पेट्रोल इंजिन दिले आहे. या इंजिनमधून एसयूव्हीला 110 पीएस पॉवर आणि 144 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. या इंजिनासोबतच एसयूव्हीमध्ये फाइव्ह-स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनचा पर्याय आहे.

Gloster blackstorm

ॲस्टरची किंमत?

हे नवीन ब्लॅक-आउट Astor लाँच करण्यात आले आहे ज्याची सुरुवातीची किंमत 14.48 लाख रुपये आहे. एमजी ग्लोस्टर ब्लॅकस्टॉर्म प्रमाणेच, अ‍ॅस्टर देखील काळ्या रंगाचे आहे.

ॲस्टर 'या' कंपन्यांना देणार टक्कर

स्पेशल एडिशन Astor ही कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये असेल. यावर्षी मेमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या Gloster Blackstorm व्हेरियंट सारखीच ही नवी कार असेल. हे कार मॉडेल Hyundai Creta Night Edition, Kia Seltos X Line आणि Skoda Kushaq Matte Edition या कंपन्यांशी स्पर्धा करेल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT