Latest

मेटाव्‍हर्समध्‍ये प्रवेश करणारे कमल हसन पहिले भारतीय अभिनेते

स्वालिया न. शिकलगार

कमल हसन यांनी लोटस मीडिया एंटरटेन्‍मेंटच्‍या माध्‍यमातून फॅन्टिको या भारताच्‍या प्रिमिअम परवानाकृत डिजिटल संग्रहणीय व्‍यासपीठासोबत सहयोग केला आहे. या सहयोगाच्या माध्‍यमातून त्‍यांचे डिजिटल अवतार, एनएफटी लाँच करण्‍यात येतील आणि हा सहयोग मेटाव्‍हर्समधील त्‍यांच्‍या पदार्पणाला देखील सादर करेल. फॅन्टिको गेम आधारित मेटाव्‍हर्स लाँच करणार आहे. जेथे प्रख्‍यात अभिनेत्‍याचे स्‍वत:चे विश्‍व असणार आहे. एनएफटी https://kamal.fantico.io/ या संकेतस्‍थळावर लाँच करण्‍यात येणार आहेत. आता कमल हसन मेटाव्‍हर्समध्‍ये प्रवेश करणारे पहिले भारतीय अभिनेते ठरले आहेत. याविषयी ते  काय म्हणाले जाणून घेऊया.

यामुळे जगभरातील त्‍यांच्‍या सर्व चाहत्‍यांना त्‍यांच्‍यासोबत परस्‍परसंवाद साधण्‍याची, त्‍यांच्‍या जीवनाबाबत जाणून घेण्‍याची, त्‍यांच्‍या डिजिटल अवतारांसोबत संवाद साधण्‍याची, तसेच भौतिक व डिजिटल स्‍वरूपात संस्‍मरणीय वस्‍तू व स्‍मृतिचिन्‍हे खरेदी करण्‍याची, सत्रांमध्‍ये भेटीगाठी करण्‍याची संधी मिळेल.

सध्‍या मेटाव्‍हर्स आणि त्‍यांच्‍या व्‍हर्च्‍युअल विश्‍वाबाबतची सविस्‍तर माहिती गोपनीय ठेवण्‍यात आली असली तरी व्‍यासपीठाने सांगितले की, ते प्रथम एनएफटींची यादी लाँच करतील, ज्‍यामुळे चाहते व आयकॉनमध्‍ये अधिक जवळीक निर्माण होईल. कमल हसन यांनी चित्रपटांच्‍या विविध शैलीसह नेहमीच प्रयोग केले आहेत. चित्रपटांमधील त्‍यांचे विभिन्‍न लुक व तंत्रज्ञानाचा वापर नेहमीच उल्‍लेखनीय राहिला आहे. म्‍हणून भावी मनोरंजन असण्‍याची अपेक्षा असलेल्‍या व्‍हर्च्‍युअल विश्‍वामध्‍ये त्‍यांची उपस्थिती असणे हे स्‍वाभाविकच आहे.

याविषयी हसन म्‍हणाले, "मी डिजिटल व भौतिक विश्‍वाच्‍या उदयोन्‍मुख संयोजनाचा अनुभव घेण्‍यास खूपच उत्‍सुक आहे, जे आता मेटाव्‍हर्स म्‍हणून लोकप्रिय होत आहे. सहा दशकांहून अधिक काळाच्‍या माझ्या जीवनप्रवासाने माझ्या वैयक्तिक व व्‍यावसायिक जीवनामधील फरक सादर केला आहे, जो मी या मेटाव्‍हर्सच्‍या माध्‍यमातून दाखवणार आहे."

फॅन्टिकोचे संस्‍थापक अभायनंद सिंग म्‍हणाले, "आम्‍हाला सांगताना खूप आनंद होत आहे की, आम्‍ही भारतामध्‍ये गेम-आधारित मेटाव्‍हर्स लाँच करणार आहोत, जो खूपच अद्वितीय असणार आहे. आमच्‍या व्‍यासपीठासह हसन यांच्‍यासारख्‍या दिग्‍गज व्‍यक्‍तीचा सहयोग अधिकाधिक क्रिएटर्सना चाहत्‍यांना संलग्‍न करण्‍याचे भवितव्‍य आत्‍मसात करण्‍यासाठी ट्रेण्‍ड स्‍थापित करेल."

SCROLL FOR NEXT