नवी दिल्ली – पुढारी ऑनलाईन : भारतीय ई कॉमर्स कंपनी Meesho ने २२ ऑक्टोबर ते नाव्हेंबर या काळात सर्व कर्मचाऱ्यांना ११ दिवसांची सुटी दिली आहे. कंपनी सलग दुसऱ्या वर्षी अशा प्रकारची सुटी देत आहे. कंपनी Reset and Recharge असा प्रोग्रॅम राबवत आहे, त्या अंतर्गत ही सुटी देण्यात येते. कर्मचाऱ्यांनी कामापासून काही दिवस बाजूला व्हावे, आणि आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. (Meesho has announced a 11-day companywide break)
Meesho ही कंपनी कर्मचारी केंद्रित आहे आणि कर्मचाऱ्यांचा आरोग्याची, मानसिक स्वास्थ्याची आम्ही काळजी घेतो, असे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीचे संस्थापक विदित आत्रेय म्हणाले, "अंतराळवीरांनाही विश्रांतीची गरज असते. Meesho मध्ये आम्ही असेच महत्त्वाच्या मिशनवर काम करत आहोत. काम महत्त्वाचे आहेच; पण आरोग्य अमुल्य आहे. Reset and Recharge अंतर्गत आमचे कर्मचारी २२ ऑक्टोबरपासून सुटीवर जातील आणि रिचार्ज होऊन परत कामावर येतील."
पारंपरिक कमाची पद्धत बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही सुटी कशी घालवायची ते कर्मचारी ठरवतात. काही कर्मचारी कुटुंबला वेळ देतात, काही फिरायला जातात. आमच्या अशा धोरणांमुळे आम्ही कर्मचारी केंद्रित कंपनी आहोत. त्यामुळे कर्मचारी टिकवून ठेवण्याचे प्रमाणही आमच्याकडे जास्त आहे, अशी प्रतिक्रिया Meeshoच्या ह्युमन रिसोर्स विभागाचे प्रमुख आशिष कुमार सिंग यांनी दिली आहे.
हेही वाचा