गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत! | पुढारी

गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत!

गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन  – भारतीय उद्योगपती आणि अब्जाधीश गौतम अदानी आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. आदानी ग्रुपचे शेअर्स वधारल्याने गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी भर झालेली आहे. फोर्बज रिअल टाईम बिलिनियर लिस्टनुसार अदानी यांची नेटवर्थ १५५.७ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. सप्टेंबर १६पासून त्यांच्या संपत्तीत ४ टक्के भर पडली आहे. तर टेस्लाचे इलॉन मस्क पहिल्या क्रमांकावर आहेत, त्यांची संपत्ती २७३.५ अब्ज डॉलर इतकी आहे.

अदानी ग्रुपमधील कंपन्या अदानी एंटप्राईज, अदानी पोर्ट आणि अदानी ट्रान्समिशन या कंपन्याचे शेअर्स चांगलेच वधारले आहेत, त्यामुळे गौतम अदानी यांच्या संपत्तीतही मोठी भर पडलेली आहे. फक्त २०२२ या वर्षात अदानी यांच्या संपत्ती ७० अब्ज डॉलरची भर पडलेली आहे. जगातील पहिल्या १० श्रीमंत व्यक्तीत इतकी संपत्ती वाढलेले ते एकमेव उद्योगपती आहेत.

तर फ्रान्समधील LVMH कंपनीचे बर्नाड अर्नाल्ट तिसऱ्या क्रमांकवर आहेत. तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी या यादीत ८व्या क्रमांकावर आहेत.  अदानी यांचे वय ६० इतके आहे. सुरुवातीला त्यांचा उद्योग समूह बंदर, ऊर्जा अशा क्षेत्रात कार्यरत होता. पण गेल्या काही वर्षांत अदानी समूहाने सिमेंट, माध्यम, विमानतळ अशा किती तरी क्षेत्रांत विस्तारलेला आहे.

हेही वाचा :

Back to top button