Latest

virajas-shivani wed : मृणाल कुलकर्णीच्या मुलाच्या लग्नाची तारीख ठरली!

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

लोकप्रिय अभिनेत्री मृणाल कुलकर्णीच्या यांचा मुलगा, अभिनेता विराजस कुलकर्णीच्या (virajas-shivani wed) लग्नाची तारीख ठरली आहे. विराजस आणि शिवानी रांगोळे पुढील महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (virajas-shivani wed)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या लग्नाच्या पत्रिकेनुसार, त्यांचे लग्न ७ मे रोजी पार पडणार आहे. हा लग्नसोहळा सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत पार पडणार आहे.

'माझा होशील ना' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून अभिनेता विराजस कुलकर्णीने वाहव्वा मिळवली होती. तर शिवानी रांगोळेदेखील एक प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने 'सांग तू आहेस का?' मालिकेत भूमिका केली होती.

विराजस कुलकर्णीची आई प्रसिध्द अभिनेत्री

अभिनेत्याची आई प्रसिध्द मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आहे. shivani ने छोट्या पडद्यावरील 'सांग तू आहेस ना' या मालिकेत काम केले होते. ही मालिका संपुष्टात येऊन बराच कालावधी गेला आहे. यातील shivani ची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
shivani आणि virjas यांच्या इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो पाहायला मिळतात. त्यांचे काही व्हिडिओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

साखरपुड्याचे फोटो केले होते शेअर

टीव्ही अभिनेत्री शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी यांचा साखरपुडा झाला, त्यावेळी त्यांनी फोटो शेअर केला होता. Put a ring on it!#2022 #virani अशी कॅप्शन लिहित त्यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. हातातील अंगठी दाखवत तिने फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी हे दोघे स्माईल देताना दिसले होते. यासोबत तिने #virani असा हॅशटॅग दिला होता. शिवानीने इन्स्टाग्रामवर रिंगसोबतचा फोटो शेअर केला होता, त्यामध्ये लिहिले होते, २०२२मध्ये रिंग घातली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT