Latest

Maratha reservation : मराठ्यांमध्ये ओबीसी नेत्यांना वठणीवर आणण्याची ताकद : जरांगे-पाटील

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओबीसी नेत्यांनी सुरु केलेल्या षडयंत्राकडे सरकारने लक्ष द्यावे. ओबीसी नेत्यांना वठणीवर आणण्याची ताकद मराठ्यांच्यामध्ये आहे, असा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि. ७)  माध्यमांशी संवाद साधताना दिला. यावेळी त्‍यांनी अप्रत्यक्षपणे राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अजित पवार गटाचे नेते छगन भूजबळ यांच्यासह सरकारवर निशाणा साधला. (Maratha reservation)

या वेळी जरांगे-पाटील म्‍हणाले की, मराठ्यांना हक्‍काचे आरक्षण मिळू नये, यासाठी  जाणीवपपूर्वक षडयंत्र सुरु आहे.  मराठा आरक्षणासाठी शांततेच्‍या मार्गाने आंदाेलन करणार्‍या तरुणांवर  गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्‍यभरात मराठा समाजाचे शांततेत आंदाेलन सुरु आहे. मात्र काही ठिकाणी झालेल्‍या जाळपाेळीच्‍या घटना हा अंतर्गत वादातून झालेल्‍या आहेत. यामध्‍ये काेणत्‍याही मराठा आंदाेलकांचा सहभागी नाही. चुकीच्‍या पद्‍धतीने मराठा आंदाेलकांवर गुन्‍हे दाखल केले जात आहेत. याची राज्‍य सरकारने गंभीर दखल घ्‍यावी, असे आवाहनही त्‍यांनी केले.

Maratha reservation : मराठा आंंदोलनाला गालबोटच लावण्याचा प्रयत्न

सत्ताधारांच्या नेत्यांकडून मराठा आंंदोलनाला गालबोटच लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोर खचली पाहिजे, जात खचली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पूर्ववैमनस्यातून आमदारांची घरे जाळली गेली. यात मराठ्यांच काही देण-घेण नाही. गोरगरिबांच्या पोरांवर खोटेनाटे केसेस दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न ओबीसी नेत्यांकडून प्रयत्न केला जात आहे. पदाचा वापर करुन मराठ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच ओबीसी नेत्यांच षडयंत्र आहे. पुढे बोलताना त्यांनी इशारा दिला की, "खोटे गुन्हे दाखल करणं थांबवा अन्यथा नेत्यांना पुन्हा गावबंदी केली जाईल. लवकरात लवकर हे थांबवा अन्यथा पुन्हा जुन्या भूमिकेत येणार. आम्ही खचणार नाही आणि घाबरणारही नाही. हीच वेळ आहे मराठ्यांच्या पोरांपाठीमागे उभा राहण्याची. जर का आता थांबला नाही तर आमच्याविरोधात सुरु असलेलं षडयंत्र मोडून काढायला वेळ लागणार नाही.

पोलिसांच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा

बीड पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. बीड पोलिसांच्या पाठीशी मराठा समाज खंबीरपणे उभा आहे. ओबीसी नेत्यांना वटणीवर आणण्याची ताकद मराठ्यांच्यामध्ये आहे . ओबीसी नेत्यांनी सुरु केलेल्या षडयंत्राकडे सरकारने लक्ष द्यावे. ओबीसी नेत्यांना वटणीवर आणण्याची ताकद मराठ्यांच्यामध्ये आहे. मराठ्यांना संपवल तर तुम्हालाही संपवणार.

वेळ घ्या पण आरक्षण द्या, अशी घोषणा करत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी (दि.२) उपोषण सोडण्याची घोषणा केली. दरम्यान, जरांगे पाटलांनी सरकारला २ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते. दरम्यान, सरकारचे शिष्टमंडळ दि.२ रोजी जरांगे-पाटील यांची भेट घेण्यासाठी जालन्याला गेले होते. यानंतर उपोषणाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.  मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना केली हाेती.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT