पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा जाहीर. येत्या १५ नोव्हेंबरपासून मनोज जरांगे पाटील महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले," महाराष्ट्र दौरा स्वखर्चाने करणार आहे आणि हा दौरा मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी असणार आहे." आज (दि.९) ते छत्रपती संभाजीनगरमधून बोलत होते. (Maratha Reservation)
माध्यमांशाी बोलत असताना मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यासंदर्भात माहिती दिली. हा दौरा एकुण सहा टप्प्यांमध्ये आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून तिसऱ्या टप्प्यातील दौरा सुरु होईल. कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकापासून दौऱ्याचा शुभारंभ होईल. महाराष्ट्र दौरा खर्चाबाबत बोलत असताना ते म्हणाले की, "हा दौरा स्वखर्चाने होणार आहे. मराठा आंदोलनासाठी कोणी पैसे मागत असेल तर देवू नका. आम्ही पैसे घेत नाही. कोणी पैसे घेतल्याचे कळले तर त्याला सोडणार नाही".
पुढे बोलत असताना जरांगे-पाटील म्हणाले, " मराठा आंदोलनाला डाग लागता कामा नये. आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही. त्याशिवाय थांबणार नाही. येत्या १५ ते २३ नोव्हेंबर महाराष्ट्र दौरा करणार. तर १ डिसेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात करणार आहे" बोलत असताना त्यांनी आवाहन केले की," मराठा समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासठी हा दौरा करणार आहे. मराठा आरक्षण जर २४ ला नाही मिळाल तर सज्ज व्हा. साखळी उपोषणाची तयारी सुरु करा. आपल्याला एकजूट होवून मराठा आरक्षण मिळवायचं आहे."
मंत्र्यांच्या शिष्टमंडळ भेटीसंदर्भात बोलत असताना ते मिश्किलपणे म्हणाले की," शिष्टमंडळ दररोज म्हणतं आहे उद्या येतो. पण उद्या येतो, उद्या येतो असं म्हणतं पण अजुनही आलेलं नाही.
हेही वाचा